Viral Video: रेल्वेमधून लाखो लोक दररोज प्रवास करतात. अनेकदा रेल्वेस्थानकावर ट्रेन थांबणार असते तेव्हा काही जण धावत्या ट्रेनमधून उतरतात. आज सोशल मीडियावरसुद्धा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडीओ माणसाचा नाही; तर श्वान या प्राण्याचा आहे. चालत्या मंद गतीच्या ट्रेनमधून श्वान अगदी सहज उतरतो आहे; जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते आहे.
ट्रेनमध्ये उपस्थित एका अज्ञात व्यक्तीनं हा व्हिडीओ शूट करून घेतला आहे. ट्रेनमध्ये दारापाशी एक श्वान उभा आहे. रेल्वेस्थानक येणार आहे हे समजताच श्वान हा प्राणी उतरण्यास तयार असतो. स्थानक येताच कुत्रा ट्रेनमधून अलगद उडी मारतो आणि स्थानकावर धावू लागतो. हे दृश्य बघून आजूबाजूची मंडळीदेखील चकित झाल्याचे पाहायला मिळते. श्वान या प्राण्याने कशा प्रकारे उडी घेतली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
व्हिडीओ नक्की बघा :
धावत्या ट्रेनमधून परफेक्ट टाईमिंग साधत कुत्र्याची उडी :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अगदी माणसांप्रमाणे श्वान स्थानकावर उतरताना दिसला आहे. काही जण चालत्या ट्रेनमधून उडी मारताना चुकीच्या दिशेनं उतरतात आणि मग तोल जाऊन ते स्थानकावर पडतात. पण, इथे श्वानानं ट्रेन ज्या दिशेनं धावत असते, अगदी त्याच दिशेनं श्वान ट्रेनमधून उडी घेतो आणि रेल्वेस्थानकावर उतरताच धावू लागतो. तो एका जागी थांबत नाही. त्यामुळे श्वानाचा तोल न जाता, तो अगदी सहजगत्या रेल्वेस्थानकावर उतरतो. रेल्वेस्थानकावर चालणारे लोकही श्वानाला माणसासारखं उतरताना पाहून थक्क होतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @scienceguys या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही प्रवासादरम्यान अनेकदा पाहिलं असेल की, दारापाशी उभे असणारे अनेक जण ट्रेनची गती जेव्हा मंद असते, धावत्या ट्रेनमधून रेल्वेस्थानकावर उतरतात. यादरम्यान ते अनेकदा उतरताना स्थिर थांबत नाहीत, तर धावत थोडं पुढे जातात; जेणेकरून ते पडणार नाहीत किंवा त्यांचा तोल जाणार नाही. सोशल मीडियावर श्वान हा प्राणी याचं अनुकरण करताना दिसून आला आहे.