scorecardresearch

Premium

VIDEO : “खोया खोया चाँद खुला आसमान…” मुंबईच्या रस्त्यावर चालत्या रिक्षात गात होता चालक सुरेख गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑटो रिक्षा चालकाचा आहे.या व्हिडीओत हा ऑटो रिक्षा चालक चक्क चालत्या रिक्षात गाणं गाताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

a driver sing a bollywood song in moving auto rickshaw mumbai
मुंबईच्या रस्त्यावर चालत्या रिक्षात गात होता चालक सुरेख गाणं (Photo : itsamittrivedi/Instagram)

Viral Video : राज्याची राजधानी आणि देशातील आर्थिक शहर म्हणून ओळखली जाणारी मुंबई अनेकांची प्रिय आहे. दरदिवशी लाखो लोक मुंबईत येतात. अनेक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे येतात. मुंबई सर्वांना आपली हक्काची वाटते. सोशल मीडियावर मुंबई शहराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंबई लोकलचे व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑटो रिक्षा चालकाचा आहे.या व्हिडीओत हा ऑटो रिक्षा चालक चक्क चालत्या रिक्षात गाणं गाताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ संगीतकार अमित त्रिवेदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक ऑटो रिक्षा चालक चालत्या रिक्षामध्ये गाणं गाताना दिसत आहे. रिक्षाला कॉन्सर्टचा लूक दिला असून रंग बेरंगी लाईट्सनी या रिक्षा सजलेला दिसत आहे. रिक्षाच्या मागच्या बाजूला ‘विश यू हॅप्पी बर्थडे’ सह अनेक नावे लिहिली आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चालकाच्या हातात माइक आहे आणि माइकवर हा रिक्षा चालक मोहम्मद रफी यांचे लोकप्रिय गीत “खोया खोया चाँद खुला आसमान” गाताना दिसत आहे.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
enjoy every moment death is unexpected quote written on back of auto rickshaw video goes viral
रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिले असे की Video पाहून युजर्स म्हणाले, “बरोबर बोललास भावा…”
hostel days will never come back
“ते दिवस आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही”, हॉस्टेल सोडताना विद्यार्थीनी एकमेकींना मिठी मारून ढसाढसा रडल्या, VIDEO व्हायरल
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : “चले ही जाना है, नजर चुरा के यूँ..” गाण्यावर तरुणीने केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून आठवेल कॉलेजचे दिवस

या व्हिडीओला शेअर करताना अमित त्रिवेदी कॅप्शनमध्ये लिहितात, “मुंबईच्या रस्त्यावर एका खऱ्या आवडीचे दर्शन झाले. एका रिक्षा चालकाने रिक्षाला पूर्णपणे कॉन्सर्टचा स्टेज बनवला होता आणि हे पाहून मला खूप आनंद झाला.हा क्षण पाहून मला जाणवले की आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली असती तर.. पण असो, त्यांना पाहून माझा दिवस चांगला गेला. मला आशा आहे की तुमचा सुद्धा दिवस चांगला जाईल.” हा व्हिडीओ मुंबईच्या बांद्रा परिसरातील असल्याचे अमित त्रिवेदी यांनी कॅप्शनमध्ये सांगितले.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप टॅलेंटेड आहे पण ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी. तर एका युजरने लिहिलेय, “त्यांना वायरलेस माइक गिफ्ट द्यायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे असं करुन ही व्यक्ती आनंद आणि सकारात्मकता सगळीकडे पसरवत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A driver sing a bollywood song in moving auto rickshaw mumbai video goes viral ndj

First published on: 30-11-2023 at 13:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×