Viral Video : सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावनिक असतात की डोळे भरून येतात. सध्या असाच एक शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक शेतकरी आजोबा मनसोक्त नाचत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये शेतकरी एकटेच शेतात नाचताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर दोन महिला आहेत. या महिला आजोबांचा डान्स पाहून मनमोकळेपणाने हसत आहेत. व्हिडीओमध्ये आजोबा खूप आनंदी दिसत आहेत. आनंदाच्या भरात गिरक्या घेत डान्स करत आहेत. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिली आहे, “आजोबाला पाऊस पडला म्हणून झालेला आनंद.”

हेही वाचा : Banana Bhaji Video : पावसाळ्यात कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळला आहात? मग अशी करा केळीची भजी, पाहा व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shetkari_brand या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले आहे, “जो शेतकरी असेल त्यालाच कळेल आजोबांचा आनंद.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “पाऊस आला की आम्हा शेतकरी बांधवांना खूप आनंद होतो.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “आमचा शेतकरी राजा खुश तर सगळा देश खुश, यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही.”