सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल होणारे व्हिडीओ कधी आपणाला आश्चर्यचकित करतात तर कधी पोट धरुन हसवतात. शिवाय काही काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण थक्क होतो. खरं तर सोशल मीडिया हे अनेकांच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन बनले आहे. अनेक लोक आपल्या कामातून मोकळा वेळ मिळाला सोशल मीडियावर व्हिडीओ पाहणं पसंत करतात. शिवाय असे व्हिडीओ पाहण्यात आणि बनवण्यात शेतकरीदेखील मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच काही शेतकऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जो जुगाड केला आहे तो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.

आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही, शिवाय शेतकरीही आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी विविध जुगाड करत असतात. सध्या अशाच काही जुगाडू शेतकऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत तर काहीजण पोट धरुन हसत आहेत. या व्हिडीओत काही शेतकऱ्यांनी शेतात रोपे लावण्यासाठी शेतात पाणी टाकून जमीन लागवडीसाठी तयार केल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- कंपनीने पूर्वकल्पना न देता कामावरुन काढलं, संतापलेल्या कर्मचाऱ्याने अनोख्या पद्धतीने घेतला बदला; प्रकरण वाचून थक्क व्हाल

पण यावेळी दोन शेतकऱ्यांनी एका व्यक्तीच्या पायाला दोरी बांधून त्याला चक्क बैल नांगर ओढतात त्याप्रमाणे ते त्या व्यक्तीला ओढताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे शिवाय तो व्यक्तीदेखील आनंदाने त्याच्या हातातील भाताची रोपे एक एक करत जमीनीत लावताना दिसत आहे. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांच्या या अनोख्या जुगाडाचा मजेशीर व्हिडिओ एक्सवर (ट्विटर) @fasc1nate नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये “वर्किंग स्मार्टर” असं लिहिण्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांचा हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख २७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरेने लिहिलं, “स्मार्ट शेतकरी” तर दुसर्‍या एकाने लिहिलं, “स्वयंचलित मशीनची गरजच नाही.” तर अनेकांनी हा व्हिडीओ अप्रतिम असल्याचंही कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे.