स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या एका व्यक्तीने समुद्राच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अडकलेल्या माशाला वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत अडकलेल्या माशाची तडफड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल्याशिवाय राहणार नाही. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही समुद्रात प्लास्टिकचा कचरा टाकताना विचार कराल यात शंका नाही.
अनेक नागरिक सुट्ट्यांच्या दिवशी समुद्राकाठी फिरायला जातात, त्या ठीकाणी अनेक खाद्यपदार्थ असे असतात जे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विकले जातात. काही लोक खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर प्लास्टिकचा पिशव्या कचराकुंडीत टाकतात तर काही निष्काळजी लोक तो कचरा तसाच समुद्रकाठी फेकतात. पण आपण टाकलेला कचरा जलचर प्राण्यांच्या जीवावर कसा बेतू शकतं याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे.
हेही पाहा- Video: पिल्लाला रस्त्यावर पडलेले पाहून आईचं हृदय कळवळले; संकटातील हरणाची धाव होतेय Viral
हा व्हिडीओ हवामान प्रचारक माईक हुडेमा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीने प्लास्टिकमध्ये अडकलेल्या एका माशाची सुटका केली. असंख्य सागरी प्राणी आपण फेकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यात अडकतात. अगदी लहान प्लास्टिक पॅकेजिंग देखील पाण्याखाली प्राणघातक आहेत, प्लास्टिक प्रदूषण संपवण्याची वेळ आली आहे.”
हेही पाहा- “मांजरीची पिल्लं दत्तक घ्या आणि मोफत विमान प्रवास करा”; ‘या’ कंपनीची ऑफर होतेय व्हायरल
द इंडिपेंडेंट ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ श्रीलंकेच्या आसपास हिंदी महासागरात शूट करण्यात आला आहे. सागरी संवर्धन संस्था, द पर्ल प्रोटेक्टर्संना बॉक्सिंग डे दरम्यान समुद्राच्या तळाशी खडकावर हा मासा दिसला. तो पिशवीत अडकल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. या माशाला स्कूबा डायव्हिंग करणाऱ्याय पाहताच, त्याने या माशाची प्लास्टिकच्या पिशवीतून सुटका केली. पिशवीतून बाहेर पडताच मासा मोठ्या आनंदाने पोहत गेल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल
ट्विटरवर शेअर केल्यापासून, व्हिडिओला आतापर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “जलचर प्राण्यांचं संरक्षणसाठी, प्लास्टिकचा वापर कमी करा”, तर आणखी एका नेटकऱ्याने प्लास्टिकच्या कचऱ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्याने म्हटलं आहे, “इतका प्लास्टिकचा कचरा कुठून येतो आणि त्यावर, आपले काही नियंत्रण आहे की नाही? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मी प्लास्टिक कमी करण्याच्या बाजूने आहे.’ दरम्यान, अशाच एका घटनेत, मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात अडकल्यानंतर मच्छिमारांच्या एका गटाने दोन दुर्मिळ प्रजातीच्या डॉल्फिनला जीवदान दिल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.