मगर इतका खतरनाक प्राणी की तिच्यासमोर भलेभले प्राणीही टिकत नाही. सिंह, वाघ, बिबट्या अशा शक्तिशाली प्राण्यांचाही मगरीसमोर काही चालत नाही. एकदा का कुणी मगरीच्या तावडीत सापडलं तर त्याची सुटका अशक्यच. काही क्षणातच मगर आपल्या शिकाऱ्याला फस्त करते. दरम्यान धोकादायक प्राण्यांची मानवी वस्तीकडे येऊन दहशत घालण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये आणखी वाढ होत असून नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महाकाय मगर एका शाळेमध्ये घुसली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

तुम्ही कधी प्राण्यांना शाळेत जाताना पाहिलंय का? नाही ना. मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, चक्क एक महाकाय मगरच शाळेत घुसली आहे. शाळेतील आवारात महाकाय मगर आढळून येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. सर्वजण घाबरुन गेल्यामुळे मगर पकडणाऱ्यांना बोलावण्यात आलं. मगर पकडतानाचा हा व्हिडीओ खूप भयानक आणि अंगावर काटा आणणारा आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर रेस्क्यू टीमला मगरीला पकडण्यात यश येते. यानतंर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चालत्या कारच्या स्टीयरिंगमध्ये अडकलं डोक! मित्र असून पाहत राहिले, Video पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मगरींच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक भयानक दृश्य समोर आली आहेत. नुकताच समोर आलेला व्हिडीओदेखील खूप भयावह असून हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे