Viral Video : सोशल मीडियावर आजी नातवंडाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येते. सध्या आजी नातीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी नातीला झाडाच्या फांदीने झोका कसा घ्यायचा, हे शिकवतेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
आजी नातवडांचे नाते हे जगावेगळे असते. यांच्या नात्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि अनोखी मैत्री असते. सध्या अशीच मैत्री या व्हिडीओमध्ये आजी नातीमध्ये दिसून येत आहे. एकीकडे लहानपणी आई झाडाच्या फांदीने झोका घेण्यास रागवायची पण ही आजी नातीनची मैत्रीण होऊन तिला झोका कसा घ्यायचा, हे शिकवतेय. या व्हिडीओत आज्जीचं नातीनवरील हे प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या आजीची आठवण येईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजी आणि नातील दिसत आहे. हा व्हिडीओ गावाकडला आहे. नातीनला झाडाच्या फांदीने झोका घ्यायचा असतो तेव्हा आजी तिला मदत करते. तिच्यासाठी नीट झोका बांधते आणि तिला झोका घ्यायला सांगते. जेव्हा नातील नीट झोका घेत नाही तेव्हा आजी तिला झोका कसा घ्यायचा, हे शिकवते. सध्या हा आजी नातीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओतील आजीचे प्रेम पाहून काही लोकांना त्यांच्या आजोळीच्या आठवणी ताज्या होतील. आजी, आजीचे प्रेम आणि बालपण आठवेल.

a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
do you ever eat Wangi Bhaji
Viral Video : वांग्याची भजी कधी खाल्ली का? तरुण चालवतोय वांगी भजीचा स्टॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Mumbai : वाहतूक पोलिसानेच मोडला नियम, वांद्रे पुलावरून चुकीच्या दिशेने चालवत होता दुचाकी, VIDEO व्हायरल

rasikamanjarekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई त्या दिवशी खरी आजी बनते ज्या दिवशी ती तिच्या मुलांनी केलेल्या भयानक गोष्टींकडे लक्ष देणे थांबवते कारण ती तिची नातवंडे करत असलेल्या अद्भुत गोष्टींनी खूप मंत्रमुग्ध होते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही चिमुकली खूप नशीबवान आहे. तिच्याकडे इतकी गोड आजी आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “आजीचे प्रेम सर्वांच्याच नशीबात नसते ज्याच्या असते ते भाग्यवान असतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज आजीची आठवण आली. तिला देवाघरी जाऊन २० वर्षे झाली. आम्ही अशीच मजा करायचो.”