सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय सोशल मीडियामुळे अनेक लोकांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत असते. शिवाय या फ्लॅटफॉर्ममुळे अनेकजण रात्रीत फेमस झाल्याचंही आपण पाहिलं आहे. कोणी आपल्या भन्नाट जुगाडामुळे तर कोणी अप्रतिम डान्समुळे सोशल मीडियावर फेमस होत असतात. सध्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
व्हा व्हायरल व्हिडिओ ‘IPS विवेक राज सिंह फॅन’ नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर अनेकांनी आजीच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये त्यांनी हार्ट इमोजीसह लिहिले आहे, “अप्रतिम” एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये, शेतात काम करणारी आजी सूरज चित्रपटातील ‘बहारो फूल बरसाओ’ गाणे म्हणताना आहे. शिवाय या आजीचा आवाज नेटकऱ्यांना खूप आवडल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- लग्न समारंभातील अतिउत्साह जवानाच्या जीवावर बेतला; तोंडात रॉकेट लावलं आणि क्षणात होत्याचं नव्हत झालं!
व्हिडीओमध्ये आजी शेतामध्ये काहीतरी काम करताना दिसत आहेत. शिवाय त्या भर उन्हात काम करत असल्याचंही दिसत आहे. अशा उन्हाच्या कडाक्यातही त्या गाणं म्हणत आहेत. त्यामुळे अनेकजणांनी आजीच कौतुक केलं आहे. आजींनी गाणं म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आतापर्यंत हा व्हिडीओ ८० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर जवळपास ३ हजारांहून अधिक लोकांनी तो शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं आहे, ‘खूप छान आजी’. दुसऱ्याने ‘आजींचा आवाज खूप गोड आहे’ अशी कमेंट केली. छान आजी’. दुसऱ्याने ‘खूप सुंदर मता माता दी’ अशी कमेंट केली.