Viral Video : कुत्रा हा माणसाचा खूप जवळचा मित्र मानला जातो. अनेकदा कुत्रा माणसांबरोबरची मैत्री सिद्ध करताना दिसला आहे. सध्या मैत्री निभावणाऱ्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कुत्र्याची मैत्री ही एका बेघर मुलीबरोबर असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा पाळीव कुत्रा एका घरातील गेटच्या आतमध्ये आहे तर बेघर मुलगी मात्र रस्त्यावर आहे. हे दोघेही एकमेकांकडे चेंडू फेकत आहे आणि खेळण्याचा आनंद घेत आहेत. ही निरागस मैत्री पाहून कोणीही भावुक होईल. बेघर मुलीचा हा खास मित्र पाहून अनेक जण थक्क झाले.

हेही वाचा : Pune Viral Video : सोन्याची सकाळ! दगडूशेठ हलवाई गणपतीला नमस्कार करताना बस ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

theboxertuffy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हे अकाउंट या कुत्र्याच्या नावावर आहे. या कुत्र्याचे नाव टफी, ब्राऊन बॉक्सर आहे. या अकाउंटवर टफीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो त्याच्या मालकाने शेअर केले आहेत.
बेघर मुलीबरोबरची कुत्र्याची ही खास मैत्री युजर्सला खूप आवडली आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर केले आहे.