Viral Video : नवरा बायकोचे नाते पवित्र नाते मानले जाते. या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी जिव्हाळा दिसून येतो.सोशल मीडियावर जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं तर वेगवेगळ्या माध्यमातून जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण बायकोला टोपलीत उचलून आणताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका मंदिरातील आहे. मंदिर उंच टेकडीवर आहे आणि ही टेकडी चढण्यासाठी भरपूर पायऱ्या आहेत पण एका तरुणाने बायकोला त्रास होऊ नये म्हणून चक्क तिला टोपलीत बसवले आणि तिला टोपलीत उचलून आणताना या व्हिडीओत दिसत आहे. पुढे तो देवीच्या मुर्तीसमोर बायकोला नेतो आणि प्रेमाने तिला टोपलीच्या बाहेर काढतो. नवऱ्याचं बायकोविषयीचं प्रेम पाहून कुणालाही “नवरा असावा तर असा” असे वाटेल. सध्या या बाहुबली नवरोबाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : Optical Illusion : वाचनालयात गौतम बुद्धांचा चेहरा दिसतोय का? नसेल तर डोळे ७५ टक्के बंद करा अन् जादू पाहा
sameer_starboy या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “हि प्रथा आहे की अजून काही?” तर एका युजरने लिहिलेय, “ही शुटींग आहे, मला वाटले त्याने त्याच्या बायकोला खरंच टोपलीत उचलून आणले” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरा बाहुबली”
हा व्हिडीओ एका सिरीअलच्या शुटींगचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओतील तरुण हा तमिळ अभिनेता असल्याचे एका युजरने कमेंटमध्ये सांगितले आहे.