Viral Video : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हटके आवाज काढून कुत्र्यांना एकत्रित बोलवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी मानला जातो.कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असेल. सोशल मीडियावर कुत्र्याचे माणसाबरोबरच्या अनोख्या नात्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण या तरुणाचे कुत्र्यांबरोबरचे हटके नाते पाहून कोणीही अवाक् होईल. फक्त एका आवाजावरून त्याने त्याच्या अवतीभोवती कुत्रे जमा केलेली दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण एक हटके आवाज काढतोय. त्याच्या आवाजाने कुत्रे जमा होताना व्हिडीओत दिसतात. एक एक करून पुढे कुत्र्यांची टोळी या तरुणाजवळ जमा होते. तरुणाची कुत्र्यांना बोलण्याची ही हटके पद्धत पाहून कोणीही आश्चर्य व्यक्त करेन. हा तरुण जवळपास कुत्र्यांप्रमाणेच आवाज काढताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना या तरुणाची ही अनोखी कला आवडली आहे.
अनेक लोकांना पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे सुंदर आवाज काढता येतात. यापूर्वी सुद्धा तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल.

हेही वाचा : “आता हे Dark Parle-G काय आहे भाऊ?”; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, भन्नाट मीम्स एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

himanshurajoriyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुत्र्यांना बोलवण्याची निंजा टेक्निक कशी वाटली?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “कुत्राही म्हणत असेल की आपलाच भाऊ आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भावा किती कला येतात तुला आज सांग” आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “भाऊ मागच्या जन्मात तु कुत्रा असावा” एक युजर लिहितो, “मोगली” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.