Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने त्याच्या डोक्यावर नारळ फोडले आणि त्यानंतर तो खाली पडला. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस नारळ हातात घेऊन स्त्रोत म्हणत आहे. त्याच्या समोर अनेक लोक जमलेली आहेत. व्हिडीओत मात्र लोक दिसत नाही पण त्यांचा आवाज येतोय. अचानक तो डोक्यावर नारळ फोडतो आणि त्यांनतर तो परत जायला मागे वळतो पण खाली पडतो.त्यानंतर तिथे जमलेले काही लोक त्याच्या मदतीला धावले. सध्या त्याच्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. व्हिडीओत तुम्हाला देवी देवतांचे फोटो सुद्धा दिसेल. अनेक जण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन वाट्टेल ते करतात. या व्हिडीओत या माणसाला वाटले की असे केल्याने त्याला काहीही होणार नाही त्यामुळे त्याने हे कृत्य केले पण त्याला ते चांगलेच महागात पडले.

हेही वाचा : चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

dr.sosmedt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या विचित्र प्रथेवर संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी अशा घटना भारतातच का घडतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने लिहिलेय, “नारळ आधीच फुटलेले होते. डोक्यावर एकदा मारल्यानंतर खरंच नारळ फुटणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “ऑपरेशन यशस्वी झाले पण रुग्णाचा मृत्यू झाला” आणखी एका युजरने लिहिलेय, “तो देवाचा मुलगा आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याने स्वत:चा त्याग केला”