सोशल मीडियाचे जग खूप अनोखे आहे. जिथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. विशेषत: भारतीय रेल्वेसंदर्भात अनेकदा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ट्रेनच्या छतावर झोपणाऱ्या प्रवाश्याचा व्हिडीओ व्हायरल होत असतो तर कधी ट्रेनमध्ये मारामारी करणाऱ्या प्रवाशांचे व्हिडीओ व्हायरल होतात. आता रेल्वेसंदर्भात असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

पतंग उडवणे जवळपास सर्वांनाच आवडते. तुम्हीही आयुष्यात कधी ना कधी पतंग उडवण्याची मज्जा लुटली असेल. पण तुम्ही गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जाऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतला असाल. पण एक तरुण जो चक्क ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून पतंग उडवताना दिसत आहे. अतिशय धोकादायक पद्धतीने तो तरुण ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहून पतंग उडताना दिसतोय, पायात मांझाची फिरकी पकडून तो कशीही भीती न बाळगता पतंग उडवण्यात दंग आहे. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man flying a kite while standing at the train gate video goes viral on social media sjr
First published on: 12-04-2024 at 18:49 IST