Video viral : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महात्त्वाचा भाग आहे. शुभप्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी स्त्रिया उखाणा घेतात. लयबद्ध पद्धतीने नवऱ्याचे नाव घेतात. सोशल मीडियावर अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते.
सध्या असाच एका उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववधू उखाणा घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे उखाण्यातून या नवरीने तिच्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरदेव आणि नवरी घराच्या दरवाज्यात उभे असतात आणि घराच्या आत येण्यापूर्वी नवरीला नाव घेण्यास विचारले जाते. तेव्हा नवरी उखाणा घेते.
ती म्हणते, “खरं तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त, आता संधी साधून आली आहे तर होते मी व्यक्त… हॉस्पिटलमध्ये काम करता करता आमची मैत्री झाली घट्ट, मग मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात चक्क… घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट, ही आहे सिद्धेश्वर आणि समिक्षाच्या प्रेमाची गोष्ट” हा उखाण्याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरीने चक्क उखाण्यातून त्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगितलेली आहे.

हेही वाचा : VIDEO : मगरीबरोबर फोटोशूट करणं पडलं महागात! अचानक अंगावर धावून आली मगर, पाहा धक्कादायक व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mi_and_tu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आठवले साहेब लवकरच आठवले बरं का” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत,