Viral Video : सोशल मीडियावर अनेक शेतकरी बांधवांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका शेतकरी आजीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आजी शेताच्या बांधावर तुफान डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमधील आजीची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सहसा वय झालं की शरीर थकतं. अशात कामं करणंही अवघड होतं, पण ८० च्या वर वय असलेल्या या आजीने सर्वांना आश्चर्यचकित केलेले आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. शेतात अनेक महिला शेतकरी काम करताना दिसत आहेत आणि अगदी कॅमेरासमोर एक आजी एका महिलेबरोबर तुफान नाचताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होऊ शकतं. आजीचा डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा : “तुम्ही बिगबॉसच्या शिवसारखे दिसता” चिमुकल्या चाहत्याची शिवने घेतली फिरकी, VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ajay_sakharkar_30 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओतील आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं आवश्यक आहे”; तर एका युजरने लिहिले, “कुठल्याही परिस्थितीमध्ये असला तरी आनंद घेतला पाहिजे…” आणखी एका युजरने लिहिले, “असाच कायम उत्साह असो, असेच आनंदी रहा. आजीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”