Thane Railway Station Viral Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच ठाणे रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय.

रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावला असता. रेल्वेत चढत असताना पाय घसरल्याने हा व्यक्ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून खाली जात होता. मात्र या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास ही बाब लक्षात येता अत्यंत तातडीने त्याने पळत जात त्याला बाहेर खेचले.काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य रेल्वेने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत याबाबत माहिती जाहीर केली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७.३० च्या सुमारास गाडी क्रमांक २२१८३ साकेत एक्सप्रेस मुंबईहून कल्याणच्या दिशेने जात होती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नातेवाईकांना नाही तर फक्त मित्रांना दिलं आमंत्रण; अनोख्या लग्नाचा VIDEO तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. यापूर्वीही स्टेशवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा न घेता अशीच स्टंटबाजी करत जीव धोक्यात घालतात.