जगभरातील अनेक जुगाडू लोकं सतत नवनवीन जुगाडांचा शोध लावत असतात. आपल्या बुद्धीच्या जोरावर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करुन दाखवतात. यातील अनेक जुगाड लोकांच्या उपयोगी असतात. तर काही जुगाड केवळ करायची म्हणून केली जातात, जी पाहून आपणाला हसू आवरणं कठीण होतं. आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी केलेल्या विविध जुगाडांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपण त्यांचे कौतुक करतो. यामध्ये अनेकजण ट्रॅक्टर आणि बाईकच्या सहाय्याने असे अनोखे आणि भन्नाट जुगाड करतात. पण सध्या एका व्यक्तीने असा काही जुगाड केला आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. तर काहींनी डोकंच धरलं आहे. तर नेमका या व्यक्तीने कसला जुगाड केला आहे ते जाणून पाहूया.

सोशल मीडियावर आपणाला आश्चर्यचकित करणारे विविध जुगाडांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये लोक कधी कॉटला इंजिन लावून कार तयार करतात तर काही लोक घरगुती जुगाडापासून स्वस्त आणि टिकाऊ मोटर बनवतात. तर कोणी बाईकच्या साह्याने तलावातील पाणी शेतात घेऊन जातो. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीने चक्क सायकलला हेलिकॉप्टर बनवल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- चेन्नईच्या पुरात बोनेटपर्यंत बुडाली कार पण…; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video; म्हणाले, “उभयचर प्राणी…”

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने त्याच्या सायकलचे मागचे चाक काढून त्या जागेवर जास्तीची दोन चाके बसवली आहेत. यानंतर त्याने जे केले आहे, ते कल्पनेपलीकडचे आहे. हो कारण या व्यक्तीने बांबूचा वापर करून सायकलला हेलिकॉप्टर प्रमाणे बनवलं आहे. ज्यामधून तो प्रवास करतानाही दिसत आहे. शिवाय हेलिकॉप्टर प्रमाणे दिसणारी ही सायकल तो व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावरुन फिरवताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विचित्र हेलिकॉप्टरपासून बनवलेल्या सायकलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेक नेटकरी हे खूप अनोख्या पद्धतीचं जुगाड असल्याचं म्हणत आहे. सध्या या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर c.s.e.boy नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत तो 8 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण तो शेअर करत आहेत.