काल १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त ठिकठिकाणी लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलेदेखील अशा कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात आणि आनंद लुटतात. तर बालदिनानिमित्त ऑनलाइन ॲप कंपनी ब्लिंकिट (Blinkit) यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच ही स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थिनीच्या चित्राचा कंपनीचे सीईओंनी अगदीच खास पद्धतीने उपयोग केला आहे.

ऑनलाइन ॲप कंपनी ब्लिंकिट (Blinkit) यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. गुडगावच्या काही शाळांमध्ये ‘ब्लिंकिट’ने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. २५,००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांमधून गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थिनी तनिषा यादव ही विजेती ठरली. तसेच खास गोष्ट अशी की, तनिषा यादव हिने स्पर्धेत काढलेल्या या चित्राचा उपयोग ब्लिंकिट कंपनी ज्या कागदी पिशव्या डिलिव्हरी देण्यासाठी वापरते त्या पिशव्यांसाठी करण्यात आला.

हेही वाचा…भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा Whatsapp Status, Facebook वर शेअर करायच्यात? हे HD फोटो करा फ्री डाउनलोड

पोस्ट नक्की बघा :

बालदिनानिमित्त केले चित्रकला स्पर्धेचे आयोजन :

तनिषा यादव या विद्यार्थिनीने स्पर्धेत दिवाळीनिमित्त एका तरुणीचे चित्र काढले आहे. पाठमोऱ्या उभ्या असलेल्या या तरुणीने साडी नेसली आहे आणि तिच्या हातात रुमाल व त्यावर पणती ठेवली आहे. या खास चित्रासाठी तिला एक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तसेच खास गोष्ट अशी की, ‘ब्लिंकिट’चे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी तनिषा यादव हिची कलाकृती डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी पिशव्यांवर छापून, त्या पिशवीची शोभा वाढवली. साहजिकच त्यामुळे तनिषाची ती कलाकृतीही लाखो ग्राहकांपर्यंतही पोहोचली.

‘ब्लिंकिट’चे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी त्यांच्या @albinder या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विविध शाळांतील चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी, त्यांनी काढलेली खास चित्रे यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेती तनिषा यादव या विद्यार्थिनीला बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, तसेच तिचे खास चित्र असलेली ‘ब्लिंकिट’ची डिलिव्हरीसाठीची कागदी पिशवीही तिला आठवण म्हणून देण्यात आली आहे.