Viral Video : सोशल मीडियावर काही व्हिडीओ इतके अचंबित करणारे असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अहमदाबाद येथील एका बर्फाचा गोळा विक्रेत्याने लोकांना आइसगोळा सर्व्ह करण्यासाठी चक्क रोबोट ठेवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतात अनेक रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि कॅफे आहेत जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते करतात. अशाच या बर्फाचा गोळा विक्रेत्याने त्याच्या स्टॉलवर लोकांना सर्व्ह करण्यासाठी रोबोट ठेवला आहे. रोबोटीक कॅफे विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक रोबोटीक नावाचा कॅफे दिसेल. या कॅफेमध्ये बर्फाचा गोळा बनवला जातो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बर्फाचा गोळा बनवताना दिसत आहे. त्यानंतर जेव्हा हा आइसगोळा ग्राहकाला देण्याची वेळ येते तेव्हा एक रोबोट तिथे येतो आणि बर्फाचा गोळा सर्व्ह करताना दिसतो. या रोबोटमुळे हा बर्फाचा गोळाचा कॅफे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. ग्राहकांना रोबोटची ही कल्पना फार आवडली आहे.पांढऱ्या रंगाचा हा रोबोट हातात ट्रे घेऊन सर्व्ह करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या कॅफेचे नाव ‘रोबोटीक कॅफे’ असून अहमदाबाद येथील प्रह्लाद नगर परिसरात आनंद नगर रोड वर हा कॅफे आहे.

हेही वाचा : VIDEO : “पीएचडी करूनही भजी विकावी लागतेय…”, तरुणीने व्यक्त केला मोदी सरकार विरोधात संताप; पाहा व्हिडीओ

real_shutterup या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अहमदाबादमध्ये पहिल्यांदा रोबोट बर्फाचा गोळा सर्व्ह करत आहे. फक्त चाळीस रुपयांचा आणि पूर्णपणे परवडणारा, स्वच्छ आणि ऑटोमॅटीक आहे. सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “मला हा रोबोट द्या मला कामवाली बाई भेटत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “रंजनीकांत म्हणेल माझा रोबोटच्या शक्तींचा चुकीचा वापर होत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “क्रिएटिव्हीटी लेव्हल १०० टक्के” अनेक युजर्सना हा रोबोट आवडला आहे तर काही युजरनी मिश्किलपणे या रोबोटवर टिका सुद्धा केली आहे.