आपण सगळेच एखादी माहिती जाणून घेण्यासाठी युट्युबवर काही गोष्टी सर्च करतो. सर्च केल्यावर विविध युट्युब चॅनेलच अनेक व्हिडीओ आणि रिलची यादी समोर येते. त्यातच आपल्याला काही युट्युबर्सचे व्हिडीओ खूप आवडतात तर आपण त्यांना सबस्क्राईब करतो आणि नेहमी त्यांचे नवीन पोस्ट केलेले व्हिडीओ आवर्जून पाहतो. तर सोशल मीडियावर सध्या एका भारतीय महिलेची चर्चा होताना दिसते आहे. ही भारतीय महिला उत्तर प्रदेशची आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील यशोधा या महिलेचे युट्युब चॅनेल आहे. या युट्युब चॅनेलचं नाव “इंग्लिश विथ देहाती मॅडम” ( ‘English with Dehati Madam’) असे आहे. तसेच या महिलेच्या युट्युब चॅनेलला २.८५ लाखांहून स्बस्क्राइबर्स आहेत. तसेच महिला गावातील इतर महिलांना युट्युब व्हिडीओ द्वारे इंग्रजी बोलायला आणि व्याकरणाचा योग्य वापर करायला शिकवते.

हेही वाचा…“आई मला अभ्यास नको फक्त खायला हवं” अभ्यास करुन कंटाळलेल्या चिमुकल्याचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

इंग्रजी शिकवण्यासाठी सुरु केलं युट्युब चॅनेल :

महिलेने तिच्या एका यूट्यूब चॅनेलच्या व्हिडीओत, तिने उल्लेख केला आहे की, तिच्यासारख्या महिलांना आणि सहज इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिचे चॅनेल सुरू केले आहे. मे २०२२ पासून तिने ३६८ व्हिडिओ अपलोड केले आहेत.तसेच खास गोष्ट अशी की, महिला साडी नेसून, कपाळावर टिकली लावून तिने व्हिडीओ अगदीच खास पद्धतीत शूट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय महिलेने आत्तापर्यंत इंग्रजी भाषेत बोलताना व्याकरणाचा उपयोग कसा करावा, संकोच न करता इंग्रजी कसे बोलावे, दैनंदिन कामे करताना इंग्रजीचा सराव कसा करावा, घरात इंग्रजी बोलण्याचे वातावरण कसे तयार करावे आणि बरेच काही याविषयी व्हिडिओ अपलोड केले आहेत. ती अनेकदा तिच्या कुटुंबातील काही क्षण सुद्धा तिच्या व्हिडीओद्वारे शेअर करताना दिसते.