scorecardresearch

घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याला वानराने रस्त्यावरुन फरपटत नेले; धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका वानराने लहान मुलाला रस्त्यावरुन ओढत नेल्याचं दिसत आहे

घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याला वानराने रस्त्यावरुन फरपटत नेले; धक्कादायक घटनेचा Video व्हायरल
मागील काही दिवसांपासून वानरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. अशातच मागील काही दिवसांपासून वानरांचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच एका वानराने महिलेला घरकामात मदत करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तर आता एका वानराने चक्क खेळत असलेल्या मुलाला रस्तायवरुन ओढत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

वानरांना उड्या मारताना, लोकांवर हल्ला करताना आपण पाहिलं आहे. अनेकदा तर वानरांनी मारामारी केल्याचे व्हिडीओही आपण पाहिले आहेत. वानर हा अतिशय खोडकर आणि तितकाच प्रेमळ प्राणी आहे. पण काही वेळेस काही वानर खूप विचित्र गोष्टी करतात, ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. वानरांना अनेकदा रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या हातातील अन्न, वस्तू हिसकावून घेताना पाहिलं आहे.

हेही पाहा- क्षणाचाही विलंब न करता महिला कॉन्स्टेबलने वाचवले प्रवाशाचे प्राण; अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा Video पाहाच

मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका वानर चक्क एका लहान सायकलवरुन येते आणि मुलाला रस्त्यावरुन ओढत नेताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुलं घराबाहेरील मोकळ्या जागेत खेळत बसलेली दिसत आहेत. तेवढ्यात अचानक दुरून एक वानर त्याच्याकडे येत आणि खेळत असलेल्या मुलांमधील एकाला ओढते. वानर या मुलाला काही अंतरावर ओढत घेऊन जाते आणि त्याच्या हातातून मुलं निसटल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

दरम्यान, व्हिडिओमध्ये वानर मुलाला ओढत घेऊन जात असल्याचं एका व्यक्तीला दिसताच, तो व्यक्ती वानराला हूसकावण्याचा प्रयत्न करतो. शिवाय या व्यक्तीला जवळ येताना पाहून वानर घाबरते आणि मुलाला रस्त्यावर सोडून पळून जाते. त्यामुळे लहान मुलगा सुखरुप बचावतो. व्हिडीओतील व्यक्तीचं नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर आमच्या मुलांना घराबाहेर खेळायला पाठवणंही सुरक्षित नसल्याचं मुलांचे पालक म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो नेमका कुठला आहे ते अद्याप समजलेलं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या