आज ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ आहे; हा सण सगळीकडेच अगदी आनंदात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जयंतीला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी रात्री १२ च्या सुमारास बाळ स्वरूपातल्या श्रीकृष्णाची पूजा केली जाते. कृष्णजन्मोत्सवादरम्यान श्रीकृष्णाच्या मूर्तीला सुंदर पोशाख घालतात. आकर्षित सजावट करून पाळणा तयार करतात. तसेच श्रीकृष्णाच्या आवडीचे पदार्थ घरी बनवतात आणि काही जण उपवासदेखील करतात; अशा प्रकारे उत्साहात हा सण साजरा केला जातो.

सोशल मीडियावरसुद्धा वेगवगेळ्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच एका सुप्रसिद्ध उद्योगपती यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत; तर आज त्यांनी सोशल मीडियावर खास संदेश लिहून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दहीहंडी फोडणाऱ्या एका पथकाचा आणि बाजूला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे लिहिलेला फोटो शेअर केला आहे आणि एक संदेश लिहिला आहे. ज्यात लिहिले आहे की, एक संघ म्हणून काम करत आम्ही एक पिरॅमिड तयार केला, जो चंद्रावर पोहोचला. कोणतीही गोष्ट खूप मोठी नसते; जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्या आकलनाच्या पलीकडे नसते… असा संदेश लिहित आनंद महिंद्रा यांनी जन्माष्टमीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भारत एक एक पाऊल टाकत जसे चंद्रावर पोहचला, तसेच दहीहंडीचा एक एक थर रचून आपण दहीहंडीदेखील फोडू शकतो. अशी तुलना करत ट्विटमधून हा खास संदेश देण्यात येतो आहे.

हेही वाचा… गोविंदा आला रे आला …, मुंबईतील ‘या’ आहेत पाच प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या; नक्की भेट द्या!

पोस्ट नक्की बघा :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट @anandmahindra यांच्या अधिकारीक ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. टीमवर्क (Teamwork ) म्हणजे विशिष्ट ध्येय साधण्यासाठी कष्ट करून एकत्र येऊन काम करणे. संघात काम करणे बऱ्याचदा फायदेशीर ठरते. काम बऱ्याचदा वाटून दिले जाते आणि ताणसुद्धा जाणवत नाही. तसेच प्रत्येक व्यक्ती संघात काम करणाऱ्या इतर व्यक्तींना आपल्या अनुभवानुसार मार्गदर्शनदेखील करू शकते आणि यालाच अनुसरून आनंद महिंद्रा यांनी हा खास ट्विट जन्माष्टमी आणि दहीहंडीसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा जगभरात साजरा होणारा आनंदाचा सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव ६ आणि ७ सप्टेंबर दिवशी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. पहिल्या दिवशी जन्माष्टमी व दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून हा सण साजरा होणार आहे; तर सोशल मीडियावरही प्रत्येक जण जन्माष्टमीच्या वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना दिसून आले आहेत आणि त्यातच आनंद महिंद्रा यांचं ट्विट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.