सोशल मीडियावर तुम्ही हजारो वेगवेगळ्या अपघातांचे व्हिडिओ बघितले असतील. व्हायरल होणारे अपघाताचे व्हिडिओ इतके भयानक असतात की ते पाहून आपले हृदय पिळवटून जाते. कार किंवा बाईक एकमेकांना धडकल्यामुळे झालेले अपघात तुम्ही पाहिली असतील. पण, तुम्ही कधी बाईक आणि घोड्याचा अपघात पाहिला आहे का? नसेल तर तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

हो कारण सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घोडा आणि बाईकस्वार हे एकमेकांना धडकल्याचं दिसत आहे. हा अपघात खूप भयंकर असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील देवास येथील आहे.

हेही पाहा- “आईची माया…” मुलगा मिटींगमध्ये बिझी, काळजीपोटी आईने केला मेसेज; WhatsApp चॅटींगचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी भावूक

हेही वाचा- आयुष्यभर कष्ट केलं अन् म्हातारपणी पालटलं नशीब; रिक्षा चालक रात्रीत बनला करोडपती

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक घोडेस्वार रस्ता ओलांडत असताना अचानक एक बाईकस्वार भरधाव वेगात येताना दिसत आहे. त्याच्या बाईकचा वेग इतका असतो की तो समोर घोडेस्वार आल्याचं पाहूनही त्याला अचानक ब्रेक लावता येत नाही. त्यामुळे हा बाईकस्वार समोरुन येणाऱ्या घोड्याच्या पुढच्या आणि मागच्या पायांमध्ये शिरतो आणि जोरात बाईकवरुन खाली कोसळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत पुढे घोडेस्वार आणि घोडाही खाली पडल्याचं दिसत आहे. मात्र, घोडा कसा तरी उठतो आणि तिथून निघून जातो, तर काही वेळाने घोड्यावर बसलेला माणूसही उठताना दिसत आहे. मात्र, बाईकस्वार जागीच पडून राहतो. या भयंकर अपघाताचा व्हिडीओ IamSuVidha नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.