Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका विद्यार्थ्याने पास होण्यासाठी उत्तरपत्रिकेत असे काही केले की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. विद्यार्थ्यांच्या अनेक व्हायरल उत्तरपत्रिका तुम्ही पाहिल्या असेल पण या व्हिडीओतील उत्तरपत्रिका पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक शिक्षक एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शिक्षक सांगतात की विद्यार्थ्याने प्रश्न पुन्हा लिहिला आहे. त्यानंतर शिक्षक दुसरा प्रश्न पाहतात तेव्हा त्या विद्यार्थ्याने त्या खाली लिहिलेय, “चल मेरी कॉपी गुरु के पास, इच्छा होगी तो करेंगे पास’एवढंच काय तर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की विद्यार्थी हुशारीने उत्तरपत्रिकेत २०० रुपये लपवून ठेवतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की विद्यार्थ्याने पास होण्यासाठी अत्यंत हुशारीने शिक्षकांना २०० रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Passenger shares video of Kashi Express’s overcrowded coach.
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral
Helper wanted in momo shop salary
मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी

हेही वाचा : चहा पिण्यासाठी पठ्ठ्याचा हटके जुगाड; बाईकला लावला क्यूआर कोड अन्… पाहा VIDEO

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “एकसो पचास मे दो….” कापड विक्रेत्याने फॉरेनरला शिकवले की कपडे कसे विकायचे…

quicshorts या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका विद्यार्थ्याने शिक्षकांना लाच देऊन परिक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “हे खूप चुकीचं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “कुठे नेऊन ठेवला भारत देश माझा” आणखी एका युजरने लिहिलेय, “कृपया असे करू नये.”