Viral Video : लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाइलचं वेड आहे. घरी आरश्यात बघून मिरर सेल्फी काढणं, गाणं गाताना किंवा काही तरी बोलताना व्हिडीओ किंवा स्वतःचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ऐकणं; अशा अनेक गोष्टी करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. तर लहान मुलंसुद्धा मोठ्यांचे अनुकरण करून मोबाइल हातात घेऊन फोटो काढण्याचा किंवा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक लहान मुलगा ट्यूशनमध्ये अभ्यास करायला जाताना मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करतो, हे पाहून ट्यूशनच्या शिक्षकाचे हावभाव बघण्यासारखे असतात.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. लहान मुलगा अभ्यास करण्यासाठी ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकाच्या घरी जात असतो. मुलगा डाव्या हातात वही-पुस्तक तर उजव्या हातात मोबाइल ठेवतो आणि ट्यूशनमध्ये जात असतो. तसेच शिक्षकाच्या घरी येता-येता तो व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात करतो. पण, शिक्षक गोठ्यात असतात आणि गाईचं शेण उचलून एका बादलीमध्ये उचलून ठेवत असतात. तर हे दृश्य चिमुकल्याच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होते, हे पाहून शिक्षक रागवतात आणि त्याला व्हिडीओ बंद करायला सांगून निघून जायला सांगतात. चिमुकल्याचा हा मजेशीर व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…Video: ‘या मित्रांनो टिपऱ्या खेळायला!’ गावाकडे रंगला आजोबांच्या ग्रुपचा अनोखा गरबा…

व्हिडीओ नक्की बघा :

ब्लॉग बनवत मुलगा पोहचतो ट्युशनला :

तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, मुलगा व्हिडीओ शूट करत येत असतो आणि म्हणतो, मी सरांच्या घरी ट्यूशनमध्ये अभ्यास करायला आलो आहे. असे म्हणताच सरांकडे बघतो आणि म्हणतो, सर शेण उचलत आहेत… हे ऐकताच शिक्षक मुलाकडे बघतात आणि त्याला विचारतात, ब्लॉग बनवतो आहेस का तू ? त्यावर मुलगा हो सर, असे उत्तर देतो. हे ऐकताच शिक्षक हातातील वस्तू घेऊन रागात मुलाकडे धावत येतात आणि त्याला निघून जायला सांगतात. हे पाहून मुलगा घाबरून व्हिडीओचा तिथेच शेवट करतो. शिक्षकाचे लक्ष नसताना मुलगा मजेशीर व्हिडीओ शूट करतो आणि मस्ती करताना दिसतो आणि हे कळताच शिक्षकाचा राग अनावर होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chaprazila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा ब्लॉग बनवताना मुलगा ट्यूशनला जातो’ असे मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत. तसेच काही जण मुलाला ‘खोडकर’, तर ‘मुलामध्ये ब्लॉगर बनण्याचे सर्व गुण आहेत’, अशा अनेक कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत. एकंदरीतच हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल एवढं नक्कीच….