आपल्या देशात एकापेक्षा एक जुगाडू लोक आहेत, जे कधी कधी आपल्या अनोख्या जुगाडाने अनेकांना आश्चर्यचकित करतात. शिवाय ते असे काही जुगाड करतात, ज्याची कल्पनादेखील करता येत नाही. अशा अनेक भन्नाट आणि अनोख्या जुगाडाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. अशातच आता आणखी एका असाच जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बाईकच्या समोर एक ट्रॅक्टरचे चाक लावलं आहे, जे दिसताना खूप मजेशीर दिसत आहे, शिवाय या चाकाला एक स्टँडदेखील जोडण्यात आलं आहे ज्यावर एक मुलगा बसला आहे.

बाईक आहे की ट्रॅक्टर?

या अनोख्या आणि मजेशीर जुगाडाचा व्हिडीओ pb13_sangrur_walle नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन मुले एका विचित्र वाहनावर बसलेली दिसत आहेत. व्हिडीओत एक बाईक मागे असल्याचं दिसत आहे, तर बाईकच्या पुढे ट्रक्टरचे मोठे चाक जोडण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणझे या चाकावर एक सीटही बनवण्यात आली आहे, ज्यावर एक मुलगा बसला आहे. तर दुसरा मुलगा बाईकच्या मागच्या सीटवर बसून ती चालवत आहे.

हेही पाहा- प्राण्यांना गरिबी श्रींमती कळत नाही, त्यांना फक्त प्रेम समजत! कुत्र्यांच्या मैत्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या जुगाडाच्या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे. तर हे अनोखं वाहन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिल, “भाई, हे आश्चर्यकारक आहे.” तर दुसऱ्याने “ट्रॅक्टर आहे की बाईक” असे लिहिले आहे. तर तिसऱ्याने, “ही कार अप्रतिम आहे.”