Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच चेहऱ्यावर हास्य आणणारा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस भर रस्त्यावर लोकांचे मनोरंजन करत स्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रॅफिक पोलिस हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करतणे, हे त्यांचे पहिले महत्त्वाचे काम आहे. लोकांनी वाहतूक नियम पाळावे, याची ते नेहमी काळजी घेतात. असेच एक ट्रॅफिक पोलिस फिल्मी स्टाइलमध्ये ट्रॅफिक टाळताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटले की ट्रॅफिक पोलिस असावा तर असा. हा व्हिडीओ पाहून काही लोकांचा दिवसभराचा थकवा गायब होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या मध्ये उभे राहून स्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. फिल्मी स्टाइलनी काही वाहनांना थांबवून काही वाहनांना जाण्यासाठी सांगताना दिसत आहे. खाकी रंगाचा या पोलिस कर्मचाऱ्याचा गणवेश, डोक्यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावरील स्मित हास्यामुळे या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याकडे कोणाचे लक्ष वेधले जाणार. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. केरळ राज्यातील नॉर्थ परवूर शहरातील हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा :बापरे! चालत्या ट्रेनमधून चिमुकल्याला घेऊन खाली पडला, धावत आले लोकं; व्हिडीओ होतोय व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sethumadhavan Thampi (@sethumadhavan_thampi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sethumadhavan_thampi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कडक उन्हात नॉर्थ परवूरमध्ये एवढ्या जिद्दीने काम करणारा दुसरा पोलिस मी यापूर्वी कधीही पाहिला नाही ट्रॅफिक पोलिस थॉमस सर”.या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”पोलीस अधिकाऱ्याचा पावर ” तर एका युजरने लिहिलेय, “थॉमस सर, नॉर्थ परवूर” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप खूप आदर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केले आहे.