शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सोसायटीमधील पार्किंगची समस्या किती भेडसावते हे सांगणयाची गरज नाही. शिवाय तुम्ही जर तुमच्या पार्किंगच्या जागेत कार पार्क केली नाही, तर इतर लोक त्या ठिकाणी कार पार्क करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमची कार पार्किंगमध्ये घेऊन येता तेव्हा तिथे जागा उपलब्ध नसते. शिवाय आधीच्या कारचालकाने लावलेली कार तेथून काढण्यासाठी खूप धडपड करावी लागते. अशावेळी वादही होण्याचीही शक्यता असते तर कधीकधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते.

अशा अनेक पार्किंगच्या समस्येपासून वाचण्यासाठी एका सोसायटीतील सदस्यांनी पार्किंगसाठी अनोखा जुगाड शोधून काढला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पार्किंगची जागा इतरांपासून वाचवण्यासाठी आपल्या कारची नंबर प्लेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये लटकवल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- Video viral: वर्क फॉर्म थिएटर; तरुणानं थिएटरमध्येच उघडला लॅपटॉप! नेटकरी म्हणतात, जेव्हा दोन्ही…

खरं तर प्रत्येक फ्लॅट मालकाला पार्किंगसाठी ठराविक जागा दिलेली असते, पण काही लोक रिकामी जागा दिसताच त्या ठिकाणी कार पार्क करतात. त्यामुळे ते पार्किंग ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याला त्याची कार लावण्यासाठी अनेकदा जागा मिळत नाही. या समस्येवर एका सोसायटीमधील सदस्यांनी भन्नाट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे त्यांनी आपल्या वाहनाची जुनी नंबर प्लेट आपापल्या पार्किंगच्या जागेत लावली आहे. शिवाय ही नंबर प्लेट ज्या ठिकाणी लटकवलेली आहे, त्या खाली त्याच नंबरची कार पार्क केल्याचं दिसत आहे. त्यामुळे पार्किंगच्या जागेवरुन भांडण होण्याचा सबंधच नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा- किळसवाणा प्रकार! डॉमिनोज पिझ्झामध्ये सापडल्या जिवंत अळ्या? फोटो शेअर करत ग्राहकाने केले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भन्नाट पार्किंग ट्रिकचा व्हिडीओ @amar_drayan 11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुनृ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “पार्किंगची अनोखी संकल्पना. नंबर प्लेट हवेत लटकली.” या पार्किंग जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी पार्किंगसाठी जागा शोधण्याचा हा चांगला मार्ग असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स’ (HSRP) नंबर प्लेट लागू केल्यानंतर जुन्या नंबर प्लेटचा योग्य वापर केल्याचं म्हटलं आहे