Viral Video: रिक्षा ही वाहतुकीचे एक महत्त्वाचे साधन आहे. नोकरी, शाळा, कॉलेज या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी अनेकदा आपण रिक्षाचा वापर करतो आणि प्रवास सोयीस्कर करतो. तर आज रिक्षासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क तीन रिक्षांची एक अनोखी शर्यत ठेवण्यात आली आहे, जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मैदानात अनेक लोकांची एकच गर्दी जमली आहे. कारण एक अनोखी शर्यत मैदानात पहायला मिळते आहे. तीन रिक्षाचालकांमध्ये शर्यत ठेवण्यात आली आहे. शर्यतीसाठी दोन खांब बांधले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन रिक्षा एका रांगेत उभ्या आहेत आणि समोर एक रेष आखून ठेवली आहे. एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा झेंडा या तिन्ही रिक्षांसमोर हलवते आणि शर्यतीला सुरुवात होते. मैदानात रंगलेली ही अनोखी शर्यत एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
व्हिडीओ नक्की बघा :
रिक्षांची शर्यत :
अनेकदा तुम्ही बैलगाडी, दुचाकी किंवा विविध वाहनांच्या अनोख्या शर्यती पाहिल्या असतील. अगदी वेगात जाणारी ही वाहने अनेकांना आकर्षित करतात आणि शर्यत बघणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. पण, आज शर्यत बैलगाडी किंवा इतर वाहनांची नसून तीनचाकी रिक्षाची आहे आणि अगदीच अनोखी आहे. झेंडा दाखवताच मैदानात उभ्या असलेल्या रिक्षांचे चालक रिक्षा स्टार्ट करतात आणि शर्यतीस सुरुवात होते. या शर्यतीत कोणता रिक्षाचालक जिंकला हे कळण्याआधीच व्हिडीओचा शेवट झाला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ Reddit या ॲपवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण या अनोख्या शर्यतीत सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांची विविध शब्दांत प्रशंसा करीत आहेत आणि सोशल मीडियावर या अनोख्या शर्यतीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.