यशस्वी व्यवसाय चालवण्यासाठी टीमवर्क आणि सहकार्य खूप महत्वाचे आहे. कदाचित हे यशस्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पाहिल्यास दोन मुलं सायकल चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्या लक्षात येईल. एक मूल उजव्या पेडलवर संतुलन साधत आहे, तर दुसरा डाव्या पेडलवर. सायकल चालवताना मुलं एक-एक करून पेडल मारत असल्याने ते अगदी सुसंगत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायकल चालवण्याचा हा सोपा मार्ग शेअर करताना, बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले, “हार्वर्ड बिझनेस स्कूलकडेही सहकार्य आणि टीमवर्कचे गुण दाखवण्यासाठी यापेक्षा चांगला व्हिडिओ नसेल!” आत्तापर्यंत हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि याला ८८ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी मुलांच्या क्रिएटिव्हिटीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले की ही मुले चुकून पडल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते.

VIDEO: RRR चित्रपटाची क्रेझ; मुलांनी चित्रपटगृहातच केली नाचायला सुरुवात; जबरदस्त डान्स पाहून नेटकरीही झाले खुश

स्टंटच्या नादात या मुलासोबत झाले असे काही…; Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

व्हिडीओवर कमेंट करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘हे समन्वय आणि यश मिळवण्यासाठी या दोन मुलांनी किती सराव केला असेल हे पाहून मी थक्क झालो आहे. टीमवर्क आणि शारीरिक तंदुरुस्तीचे उत्कृष्ट उदाहरण. यावरून हे सिद्ध होते की टीमवर्कला सर्वत्र मागणी आहे आणि व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.’

दुसर्‍या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘असेच काहीतरी मी माझ्या लहानपणीही केले होते, पण जखमी होण्याची शक्यता खूप होती.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A unique thing that two children did together with a bicycle anand mahindra share heart winning video pvp
First published on: 25-04-2022 at 10:23 IST