सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपणाला थक्क करणारे असतात. या व्हिडीओंमध्ये जुगाडू व्हिडीओंचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. आपल्या देशासह परदेशातील अनेक लोक वेगवेगळे जुगाड करत असतात. सध्या जपानमधील एका कर्मचार्‍याने उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी एक अनोखा जुगाडू शर्ट घातला आहे, जो पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकीत व्हाल यात शंका नाही. कारण या कर्मचाऱ्याने आपल्या शर्टमध्ये फॅन लावल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

@Rainmaker1973 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, जपानमधील उष्णतेचा सामना करण्याच्या उद्देशाने एका कर्मचाऱ्याने पंखा लावलेला शर्ट घातल्याचं पाहायला मिळत आहे. हा शर्ट घाम सुकविण्यासाठी बाहेरील हवा शोषून घेतो आणि शरीराला गारवा देण्यास मदत करतो. या कर्मचाऱ्याचा जुगाडू शर्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- भ्रष्ट अधिकाऱ्याचा विचित्र प्रताप, लाच घेताना पकडताच तोंडात कोंबल्या नोटा, बाहेर काढणाराच्या बोटाला चावला, Video व्हायरल

पंख लावलेल्या शर्टाचा व्हिडीओ आतापर्यंत ६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने शस्त्रक्रियेदरम्यान आराम देणार्‍या अशाच एअर-सर्कुलटिंग हॉस्पिटलच्या गाऊनचा वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. तर दुसर्‍या वापरकर्त्याने भारतामध्ये अशा कपड्यांच्या कमी उपलब्धतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले, जिथे बरेच लोक जास्त वेळ बाहेर काम करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपान सरकारच्या जनसंपर्क कार्यालयाच्या ब्लॉगनुसार, हे फॅन शर्ट इचिगाया हिरोशी यांनी डिझाइन केले होते, जे एक माजी इंजिनिअर आणि आता स्वतःची कंपनी कुचोफुकू कंपनी लिमिटेडचे ​​प्रमुख आहेत. २०१७ मध्ये, कंपनीला त्याच्या शर्टच्या उत्कृष्ट कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी आणि उष्णता संरक्षण क्षमतांसाठी प्रतिष्ठित “ग्लोबल वॉर्मिंग प्रतिबंधक क्रियाकलाप पुरस्कारासाठी पर्यावरण मंत्री पुरस्कार” देण्यात आला होता.