Viral Video : सध्या सगळीकडे ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.पॉलिसीचे पैसे भरायचे असतील, बाजारात वस्तूंची खरेदी करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तत्काळ पैसे पाठवायचे असतील किंवा हॉटेलमध्ये बिल भरणे आदी अनेक गोष्टींसाठी पैसे पाठवायचे असल्यास क्यूआर कोडचा (QR Code) वापर करण्यात येतो. ऑनलाइन पैसे पाठवणे हा सोपा आणि जलद मार्ग आहे; जो तुम्ही घरबसल्याही वापरू शकता. तुम्ही बाजारात अनेकदा पाहिले असेल की, प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानात क्यूआर कोडचा स्कॅनर एका विशिष्ट ठिकाणी चिकटवून ठेवतो; जेणेकरून प्रत्येक ग्राहक त्याच्या फोनमध्ये स्कॅन करून पैसे पाठवू शकेल. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. भाजीविक्रेत्या महिलेची क्यूआर कोड स्कॅनर दाखवण्याची एक अजब युक्ती पाहायला मिळाली आहे.

एका महिलेने भाजी विकण्याची अनोखी स्टाईल शोधून काढली आहे. महिलेने क्यूआर कोड एका खास अंदाजात दाखवला आहे. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, एक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात जाते. तिथे एक महिला रस्त्यावर भाजी विकायला बसलेली असते. व्यक्ती महिलेकडून भाजी खरेदी करते आणि भाजी खरेदी करून झाल्यानंतर ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोडची मागणी करते. तर खास गोष्ट अशी की, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी महिला क्यूआर कोडचं स्कॅनर वजनकाट्यावरील स्टीलच्या भांडयाखाली लावते आणि ते भांडं उलटं करून स्कॅनर दाखवते आणि व्यक्तीला पैसे पाठवण्यास सांगते. हा व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा चकित व्हाल. अनेकांना वाटलं असेल की, महिलेकडे कदाचित क्यूआर कोड स्कॅनर नसेल. पण, अगदी व्यवहाराच्या वेळी महिला अगदी खास अंदाजात स्कॅनर दाखवते आणि अनेकांना चकित करते. महिलेची अनोखी स्टाईल एकदा तुम्हीसुद्धा बघाच …

हेही वाचा… माता न तू वैरिणी! लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला; मग कागदात गुंडाळून कचऱ्यात फेकलं, काळीमा फासणारी घटना व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @joshigargigoyal या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. भाजीविक्रेत्या महिलेची ही अनोखी स्टाईल बघून अनेक जण तिची प्रशंसा करीत आहेत. तर ‘डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत आपल्या देशातील लोकांचा हात कोणीच धरू शकत नाही’, असे एक व्यक्ती कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहे. तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऑनलाइन व्यवहार केला असेल. पण, भाजीविक्रेत्या महिलेची क्यूआर कोड स्कॅनर दाखवण्याची ही अजब युक्ती तुम्ही आजवर पाहिली नसेल.