सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यामध्ये काही आपणाला पोट धरुन हसवणारे असतात तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. शिवाय कधी कधी असे व्हिडीओ पाहण्यात येतात जे पाहून आपणाला काहीतरी प्रेरणा मिळते. सध्या अशाच एका आजींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची इच्छा होईल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. या मॅरेथॉनमध्ये ८० वर्षीय आजीही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या वयोवृद्ध आजींना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत ५५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. मात्र, या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे, वयाच्या ८० व्या वर्षी साडीमध्ये धावणाऱ्या आजींची. या वयातही आजी मॅरेथॉनमध्ये धावल्यामुळे नेटकऱ्यांनी आजींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही पाहा- भाकरी नळाला धुवून खाणाऱ्या आजोबांचा Video पाहून नेटकरी झाले भावूक; म्हणाले “परिस्थितीला कधीच…”

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या आजींचा व्हिडीओ Dimple Mehta Fernandes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर व्हिडीओतील आजीचे नाव भारती असल्याचीही माहिती या अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. या वयातही आजींना धावाताना पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केलं आहे.

हेही वाचा- “कधी TV पाहिला नाही आणि रेस्टॉरंटमध्येही…”, हिरे व्यापाऱ्याच्या ८ वर्षाच्या लेकीने घेतला संन्यास

हा व्हिडीओ शअर करताना Dimple Mehta Fernandes यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘८० वर्षांच्या आजीला टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचं पाहून मला खूप आनंद झाला.’ या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, हा व्हिडीओ खूप गोंडस आणि प्रेरणादायी आहे. तर आणखी एकाने, ‘मी या आजींपासून खूप प्रभावित झालो आहे, जीवनात नेहमी सकारात्मक असायला हवी.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A video of an 80 year old grandmother running in the tata marathon with the tricolor in her hands is going viral jap
First published on: 18-01-2023 at 17:57 IST