Viral Video: लग्न हे एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आता अशा महत्त्वाच्या प्रसंगासाठी, सर्व काही खास असावे आणि सर्वात खास वधूचा पोशाख असावा, ज्याबद्दल प्रत्येकाला खूप टेंशन असते. बहुतेक नववधूंची पहिली पसंती या प्रकरणात लेहेंगा आहे. पण बदलत्या फॅशन आणि ट्रेंडनुसार नववधू आणखी बरेच पर्याय शोधत असते. देशाच्या अनेक भागांमध्ये आणि समुदायांमध्ये, नववधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी साड्या परिधान करतात. बहुतेक बंगाली वधू लग्नासाठी बनारसी साड्या घालतात, पारसी नववधू पारसी गारा साड्या घालतात, गुजराती नववधू देखील साड्या घालतात आणि गडचोला आणि मल्याळी नववधू देखील कासवू साड्या घालतात. पण आता अमेरिकेतील एका मुलीने आपल्या लग्नासाठी चक्क भारतीय लेहेंगा परिधान करुन सर्वांना चकीतच केल आहे. या नवरीची चर्चा आता सर्वत्र होत आहे. तिचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

मेकअप आणि हेअर आर्टिस्ट बियान्का लुझाडो यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर, शेअर केला आहे. या व्हिडीओत वधूचे मित्र आणि कुटुंबीय हॉटेलच्या खोलीबाहेर तिची वाट पाहत आहेत आणि जेव्हा ती लाल लेहेंगा घालून बाहेर पडते तेव्हा ते तिला पाहून आनंदी होतात आणि टाळ्या वाजवून तिचा स्वागत करुन तिला सामूहिक आलिंगन देतात.

(आणखी वाचा : दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता तरुण अन् नेमकं घडलं अस काही, तुम्हीही वाचून व्हाल हैराण…)

हा व्हिडीओ १९ नोव्हेंबर २०२२ रोजी “biancalouzado” या Instagram पेजवर शेअर करण्यात आला होता. पेजवर ८३.४ K फॉलोअर्स आहेत आणि विविध प्रकारच्या मेकअप लुक्सवर नियमित सामग्री पोस्ट केली जाते. आत्तापर्यंत, या व्हिडीओला ४,५६,५४३ लाईक्स आणि फक्त वधूचा लूक असलेल्या लोकांकडून अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. या अमेरिकन कुटुंबाच्या लग्नात पहिल्यांदाच वधूला पाहिल्यानंतर अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bianca Louzado (@biancalouzado)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय पारंपारिक लग्नाच्या पोशाखात तू खूप सुंदर दिसत आहेस, एक भारतीय म्हणून खरोखर अभिमान आहे, आणि अमेरिकन लोकांना आमच्या संस्कृतीवर प्रेम केल्याबद्दल प्रेम आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी तिला दिल्या आहेत.