सध्या सोशल मीडियावर दोन माशांचा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल हेत आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी ‘माणसांसारखे यांच्यामध्येपण मतभेद आहेत, सगळे सारखेच’, अशा मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होणे किंवा भांडणे करणे हा माणसाच्या मूळ प्रवृत्तीचा एक भाग आहे. जिथे एकमेकांचे विचार पटत नाहीत तिथे भांडणं सुरू होतात. आपण अनेक लोकांना आपल्या शेजाऱ्यांशी भांडताना पाहत असतो. पण ही भांडणं आता माणसांमध्येच नव्हे तर समुद्राच्या तळाशी जाऊन पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हो कारण सध्या दोन माशांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समुद्राच्या तळाशी दोन माशांचे भांडण सुरु असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ iamkhalidhussain786 नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये दोन मासे समुद्रात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोन्ही मासे तोंडात माती भरून ती एकमेकांवर फेकताना दिसत आहेत. जे पाहून नेटकरी समुद्रातही शेजाऱ्यांची भांडण सुरू आहेत अशा कमेंट करत आहेत.

हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओत दोन मासे एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत. नेटकऱ्यांचं मात्र या माशांची भांडण पाहून खूप मनोरंजन होत आहे. समुद्राच्या तळाशी दोन मासे एकमेकांवर राग काढत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओत, पहिला मासा तोंडात रेती घेतो आणि दुसऱ्या माशावर फेकतो, तर या माशाला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरा मासाही लगेच बिळात शिरतो आणि तिथून तोंडात रेती भरुन समोरच्या माशाच्या अंगावर फेकताना दिसत आहे.

हेही पाहा- ‘पतली कमरिया मोरी’ गाण्यावर रील करण्यासाठी टेम्पोवर चढली अन् डान्स करताना खाली पडली; Video व्हायरल

View this post on Instagram

A post shared by خالد حسین (@iamkhalidhussain786)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या माशांना एकमेकांशी भांडताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहलं आहे की, मासे शेजाऱ्यांसारखे भांडत आहेत, तर आणखी एकाने, माणसांचा माशांवर परिणाम झाल्याचं दिसत आहे, असं लिहिलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तो तीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक आहे.