लग्नसराई म्हणजे बराच खर्च. त्यातही हॉलचा खर्च सर्वात अधिक असतो. मात्र हाच खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानमधील एका हॉलने एक भन्नाट ऑफर लग्नाळूंसाठी आणली आहे. मात्र ही ऑफर मिळवण्यासाठी ठेवण्यात आलेली एक अट सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बाहावलपूर येथील एका हॉलने दुसरे किंवा तिसरे किंवा चौथे लग्न करणाऱ्यांसाठी विशेष ऑफर दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानमधील समा या वृत्तवाहिनीने दिलं आहे. आता याच वृत्तांकनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ऑफरनुसार या हॉलमध्ये दुसऱ्या लग्नासाठी ५० टक्के सूट, तिसऱ्या लग्नासाठी ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तर चौथ्या लग्नासाठी हॉल वालिमा विधी मोफत करु देणार आहे. “हिंमत असेल तर मैदानात या आणि दुसरे लग्न करुन दाखवा. लग्न करु इच्छिणाऱ्यांसाठी बाहावलपूर येथे सुरु झालेल्या नव्या हॉलने विशेष सूट दिली आहे,” असं वृत्तांकन करणारा रिपोर्टर सांगत आहे.

मात्र ही सूट मिळवण्यासाठी एक अट असल्याचे या हॉलेच्या मालकांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. एखाद्या व्यक्तीचे दुसरे लग्न असेल तर त्याच्या पहिल्या पत्नीने हॉलचे बुकींग केल्यावरच सूट देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीला ही अट मान्य आहे त्याच व्यक्तीकडून आम्ही सुरुवातीला बुकींग घेणार आहोत असंही या हॉल मालकाने स्पष्ट केलं आहे.

ही ऑफर पाहून नेटकरी सैराट झाले असून त्यांनी अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत.

यावरुन मला आठवलं…

अशा ऑफर केवळ पाकिस्तानात असतात

इम्रान विचार करत असतील

भन्नाट मार्केटींग

नवा पाकिस्तान

कसं पाहता या ऑफरकडे

काय ऑफर आहे

या हॉलची ऑफर व्हायरल झाली असली तरी याचा काही लोकांना नक्कीच फायदा होईल असं मतही काही जणांनी व्यक्त केलं आहे.