Ukhana Video : सध्या सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. दिवाळी निमित्त अनेक ठिकाणी ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. अशाच एका कार्यक्रमात एका महिलेने भन्नाट उखाणा घेतला आहे. हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.सध्या हा उखाण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
उखाणा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच आपण उखाणा म्हणतो. हल्ली एकापेक्षा क्रिएटिव्ह उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
हा व्हायरल व्हिडीओ एका दिवाळी पहाट या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की स्टेजवर गायिका वैशाली सामंत उपस्थित आहे आणि स्टेजसमोर प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रेक्षकांच्या गर्दीत एक महिला उभी दिसतेय. तिच्या हातात माइक असून ती मोबाईलमध्ये बघून उखाणा घेताना दिसत आहे.
उखाणा घेताना ही महिला म्हणते, “किशोरराव माझे भलतेच चिकट… किशोरराव माझे भलतेच चिकट.. मला आणली त्यांनी साडी, रंग त्याचा गुलाबी फिकट.. साडी नेसून केली शॉपिंग खूप सारी आणि काय सांगू खाऊ पण घातली त्यांनी मला पाणी पुरी.. पाणी पुरी खाऊन लिपस्टिक झाली हलकी त्यामुळे पर्समधून काढली लिपस्टिक केले गुलाबी ओठ, विचार आला मनात आता करू एक रोमँटीक डिनर तर धपाटा मारत किशोरराव म्हणताहेत दिवाळी पहाटला होतोय उशीर उठ जरा लवकर”
उखाणा ऐकून प्रेक्षक हसायला लागतात. स्टेजवर असलेल्या वैशाली सामंत उखाणा ऐकून म्हणतात, म्हटलं अजून काय काय सांगताय आम्हाला. खूप गोड, धन्यवाद”
हेही वाचा : याला म्हणतात संस्कार! वडीलांना पाहून चिमुकलाही पडला आजीच्या पाया, पाहा व्हायरल VIDEO
purnakishorchi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वैशाली सामंत खूप संयम राखून माझा उखाणा ऐकत होत्या. त्यांनी गाणे गाण्यापूर्वी प्रेक्षकांमधून समोर येऊन उखाणा घेण्यास विचारले होते” या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.