आजवर आपण ऐकत आलेल्या माहितीनुसार आणि पुस्तकांनुसार प्रभू श्रीराम व त्यांची पत्नी सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण हे १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. तेव्हा पहिल्यांदा दिवाळी हा सण साजरा करण्यात आला होता. आज सोशल मीडियावर एका तरुणाने दिवाळीनिमित्त श्रीराम आणि त्यांची सीता यांचे खास चित्र रेखाटले आहे. पण, हे चित्र पेन्सिल किंवा कोणत्याही रंगाचा उपयोग न करता, शिक्क्याचा उपयोग करून रेखाटण्यात आले आहे.

व्हिडीओत सुरुवातीला एक तरुण एक पांढरा कागद घेताना दिसते. त्यानंतर एक शिक्का (Stamp) घेऊन, तो शाईत बुडवून घेतो. या शिक्क्यावर जय श्रीराम असे लिहिलेले असते. या शिक्क्यांचे ठसे कागदावर उमटवून तो श्रीराम आणि सीता यांचे सुंदर चित्र रेखाटतो. हे चित्र काढण्यासाठी तो शाईमध्ये हा शिक्का बुडवून घेतो आणि श्रीराम-सीता यांचा चेहरा, डोळे, त्यांची खास वैशिष्ट्येसुद्धा या शिक्क्यांच्या मदतीने चित्रित करतो. तरुणाने कशा प्रकारे शिक्क्यांच्या मदतीने श्रीराम आणि सीता यांचे चित्र काढले ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा Whatsapp Status, Facebook वर शेअर करायच्यात? हे HD फोटो करा फ्री डाउनलोड

व्हिडीओ नक्की बघा :

शिक्क्याने काढले राम-सीता यांचे चित्र :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, पेन्सिल, रंग यांचा उपयोग न करता तरुणाने अगदीच हटके पद्धतीने सुंदर चित्र काढले आहे. शिक्का शाईत बुडवून घेतल्यावर तरुण अशा पद्धतीने कागदावर त्या शिक्क्यांची रचना करतो की, हळूहळू श्रीराम आणि सीता यांचे चित्र त्यातून अवतरल्याचे तुम्हाला दिसेल. हा कलाकार अशा खास पद्धतीने हे चित्र काढतो आहे की, ते बघून खरोखरच तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिक्क्यांच्या मदतीने तो राम-सीता यांचे पोशाखसुद्धा चित्रित करतो. आजवर तुम्ही अनेक चित्रे पाहिली असतील; पण शिक्क्यांच्या मदतीने काढलेले हे चित्र अगदीच अनोखे आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @artistshintumorya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिंटू मौर्या असे या कलाकाराचे नाव आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण कमेंटमध्ये ‘जय श्री राम’ असे लिहिताना दिसत आहेत. अनेक जण तरुणाच्या या अद्भुत कौशल्याचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे.