Viral video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. याच गाण्यावर गावातील एका महिलेने केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघितल्यानंतर खऱ्या टॅलेंटला संधीची वाट पाहावी लागत नाही हे सिद्ध होतंय. शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना बऱ्याच संधी असतात; मात्र त्या तुलनेत गावाकडच्या महिलांना तेवढ्या संधी उलब्ध नसतात. कधी कधी यामुळे त्यांच्यातले छुपे गुण कधीच बाहेर येत नाहीत. मात्र, आता सोशल मीडियामुळे कुणालाही अगदी सहजपणे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. अशीच कला या गावच्या महिलेने सादर केली.

कांचन नावाच्या या महिलेने हा डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजस्थानी पद्धतीची लाल साडी नेसून या महिलेनं जबरदस्त असा डान्स केलाय. यावेळी महिलेचे एक्सप्रेशन आणि वेगवेगळ्या स्टेप्स या बघण्यासारख्या आहेत. महिलेचं हे टॅलेंट पाहून तुम्हीही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्याशिवाय तब्बल हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून, अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “तुझा साधेपणा आणि तुझे नृत्य खूप सुंदर आहे, मला तुमचे व्हिडीओ डान्स खूप आवडतात.” कांचन ही गावात राहणारी महिला असून, तिचे सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात.