Viral Video: समाजमाध्यांवर सतत विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला आनंद देऊन जातात; तर काही व्हिडीओ आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक धडकी भरवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात एक बाईकचालक सुसाट वेगाने जात असताना अचानक असं काही होतं, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात. अनेकदा या सगळ्यात कोणाचीच चूक नसते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याच्या कडेला असलेल्या मदरशामधून काही लहान मुले बाहेर पडतात. त्यामधलाच एक मुलगा पळत पळत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात एक बाईकचालक वेगाने येतो. यावेळी तो लहान मुलगा आणि बाईकचालक बेसावधपणे एकत्र आल्याने दोघांची धडक होऊन, तो मुलगा खाली कोसळतो. यावेळी रस्त्यावरील इतर लोक पळत पळत त्या मुलाजवळ येतात. बाईकचालकही पुढे जाऊन गाडी थांबवतो आणि मागे पळत येतो. हा व्हिडीओ कर्नाटक येथील असल्याचे म्हटले जात असून, त्या अपघातात सात वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @PTI_Newsच्या X अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या आहेत. अनेक जण त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “यात बाईकचालकाची चूक नाही.” दुसऱ्यानं लिहिलंय, “या मुलाचे पालक कुठे होते? लक्ष देता येत नाही का मुलांवर?” तिसऱ्यानं लिहिलंय, “बाईकचालक नि:स्वार्थी आहे. त्याची चूक नाही.”