बेरोजगारी वाढली आहे, पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा वेळी निराश न होता परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. या प्रवासात हिंमत देणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. छोटी प्रेरणा देखील मोठे कर्तृत्व घडवण्यात मदत करू शकते. असाच एक प्रेरणादायी व्हिडिओ आणि उत्साह वाढवून आत्मविश्वास वाढवणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे जो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यात पंकज त्रिपाठी यांनी कमी सुविधा असताना लोक कसे शक्तिमान होतात, याबाबत भाष्य केले आहे, तसेच युवकांना सल्ला देखील दिला आहे. हा सल्ला खरच जीवन पलटू शकतो.

(Viral video : घसरगुंडीवरून घसरताना महिलेची क्रॅश लँडिंग, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल)

काय म्हणाले पंकज त्रिपाठी?

मी अनेकदा म्हणतो, नदीवर पूल नसेल तर माणूस पोहायला शिकतो. म्हणून एखाद्याकडे जेव्हा कमी सुविधा असेल तेव्हा त्या व्यक्तीने निराश होऊ नये. याचा अर्थ असा होतो की परिस्थिती तुम्हाला ताकतवर आणि चांगला व्यक्ती बनवत आहे, असे पंकज त्रिपाठी म्हणाले. त्यांचे हे विधान नेटकऱ्यांना खूप पटले आहे.

दिपांशू काबरा यांनी त्रिपाठी यांचा व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट देखील केली आहे. बात गहरी है, समझनी जरुरी है, असे म्हणत काब्रा यांनी त्रिपाठी यांच्या विधानाचे गांभीर्य व्यक्त केले आहे. नेटकऱ्यांना काब्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ खूप आवडत आहे.

(Viral Video : गुलाब जामूनसोबत केला विचित्र प्रयोग, नावही दिले हटके, संतप्त नेटकरी म्हणाले, या व्यक्तीवर..)

नेटकऱ्यांनी दिली समिश्र प्रतिक्रिया

दरम्यान अनेक युजर्सने पंकज त्रिपाठी यांनी दिलेला सल्ला स्विकारला आहे. तर काहींनी वेगळा विचार व्यक्त केला आहे. म्हणणे खूप सोपे आहे, पण त्या मार्गावरून जातात त्यांनाच ते कळते, असे एक युजर म्हणाला. तर अभाव असताना मनुष्य भरपूर काही शिकतो असे मत एका युजरने व्यक्त करत त्रिपाठी यांच्या विचारांचे समर्थन केले आहे.