सोशल मीडियावर दररोज नेताना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लोक रातोरात स्टार झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. व्हायरल झाल्यामुळे लोकांना चुटकीसरशी लोकप्रियता मिळते आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावर चढतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओमुळे रानू मंडल आणि ‘कचा बदाम’ फेम भुवन कमालीचे लोकप्रिय झाले.

आता लिंबाच्या किमती गगनाला भिडत असतानाच लिंबू सोडा विकणाऱ्या एका व्यक्तीचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. लिंबू सोडा विकण्याची त्यांची शैली अतिशय आश्चर्यकारक आणि मनोरंजक आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती लिंबू सोड्याच्या दुकानात आहे आणि गाणे गात लिंबू सोडा बनवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे.

Viral Video : वेगात आलेली BMW आदळली रस्ता क्राॅस करणाऱ्या महिलेला; पुढे जे झाले ते पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्या पेजवर तो नऊ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अशाप्रकारे या लिंबू सोडा विक्रेत्यालाही चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. तीन वर्षांपूर्वीही या व्यक्तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्येही तो आपल्या स्टायलिश अंदाजात लिंबू सोडा विकत होता. ही व्यक्ती पंजाबमधील रूप नगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.