scorecardresearch

Premium

जपानच्या राजदुतांना भारतीय खाद्यपदार्थांची लागली चटक! पाणीपुरीनंतर आता लिट्टी-चोखावर मारला ताव, पाहा photo

आता जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी त्यांच्या ट्विटरवर लीट्टी चोखा खाताना एक फोटो शेअर केला आहे.

After panipuri the japanese ambassador was seen eating litti chokha in banaras
आता जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी त्यांच्या ट्विटरवर लीट्टी चोखा खाताना एक फोटो शेअर केला आहे. ( Hiroshi Suzuki, Ambassador of Japan / twitter)

असं म्हणतात की, बिहारी लोकांसाठी लिट्टी चोखा हा फक्त पदार्थ नाही तर ती एक भावना आहे. बिहारशिवाय लीट्टी चोखा देश विदेशात आवडीने खाल्ला जात आहे. तुपात भिजवलेली गरमा गरम लिट्टी आणि मसालेदार वांग आणि मिर्चीपासून तयार केलेला चोखा प्रत्येकाला आवडतो. देशी असो की परदेशी प्रत्येक व्यक्ती एकदा तरी हा पदार्थ नक्कीच खाऊन पाहतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील हा पदार्थ अत्यंत पौष्टिक असल्याचे मानले जाते. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटामध्ये जपानचे राजदूत लीट्टी चोखा खाताना दिसत आहे.

जपानच्या राजदुतांना भारतीय खाद्यपदार्थांची लागली चटक!

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणार्‍या बनारसाला एकदा तरी भेट द्यावे असं प्रत्येकाला वाटतं. एकीकडे हे शहर प्राचीन संस्कृतींना आपल्या कवेत घेते, तर दुसरीकडे अविस्मरणीय बनारसी खाद्यपदार्थांची चव या शहराला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी येते. म्हणूनच इथले रस्त्यावरचे पदार्थ एकदा चाखले की पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा ही होते. बनारसमध्ये बाटी चौखा हा खाद्यपदार्थ अत्यंत प्रसिद्ध आहे. हा लिट्टी चौखाचा एक प्रकार आहे ज्याला बनारसमध्ये बाटी चौखा असं म्हणतात. आता या भारतीय खाद्यपदार्थांच्या चवीने जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांना देखील वेड लावले आहे.

हेही वाचा – हिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार? ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय?

जपानच्या राजदुतांना भारतीय खाद्यपदार्थांची लागली चटक!

हिरोशी हे सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ आहे. अशा परिस्थितीत या प्रवासाची चर्चाही जोरात सुरू आहे. दरम्यान, बनारसच्या दौऱ्यामध्ये हिरोशी यांनी विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे. या आधी त्यांनी पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ शेअर केला होता जो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता जपानचे राजदूत हिरोशी सुझिका यांनी त्यांच्या ट्विटरवर लीट्टी चोखा खाताना एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – हवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा! ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर

या फोटोवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. ३ हजारापेक्षा जास्त लोकांनी या फोटोला पसंती दर्शवली असून अनेकांनी कमेंटस केल्या आहेत. एकाने लिहिले की ”जबरदस्त!… बाटी चोखा ही पूर्वांचलची सर्वात प्रसिद्ध मेजवानी मानली जाते. भारतीय संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळते.”
तर दुसऱ्याने म्हटले की, ”बिहारमध्ये लिट्टी चोखा खाण्याचे आमंत्रण देत आहोत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After panipuri the japanese ambassador was seen eating litti chokha in banaras snk

First published on: 30-05-2023 at 11:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×