पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या या भेटीचा व्हिडीओ भाजपाच्या अनेक नेत्यांनी तसेच सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ट्विट करण्यात आलाय. या सर्वच ट्विटमध्ये मोदींची ही सप्राइज व्हिजिट म्हणजेच अचानक दिलेली भेट होती असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. आयाआयटी कानपूरमधील पदवीदान समारंभामध्ये सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायची असल्याने मोदींनी अचानक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात आलं.
पंतप्रधान मोदीं पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणही केलं. यामध्ये त्यांनी सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांमध्ये आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरु करावं असं आवाहन केलं. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं होतं.
मोदींनी पदवीदान समारंभानंतर येथील काही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना अचानक भेट देण्याचं ठरवण्यात आल्याचं सांगितलं गेलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही यावेळी त्यांच्या सोबत होते. मात्र मोदी जेव्हा या सप्राइज व्हिजिटदरम्यान वर्गात गेले तेव्हा वर्गामधील सर्व विद्यार्थी वार्षिक स्नेहसंम्मेलन असल्याप्रमाणे नटून थटून बसल्याचं दिसलं. मोदींच्या या कथित सप्राइज व्हिजिटमध्ये सर्वच विद्यार्थी ठरवल्याप्रमाणे पारंपारिक भारतीय पेरहावामध्ये असल्याचं दिसलं. यावरुनच अनेकांनी आता ही खरोखरच मोदींनी अचानक दिलेली भेट होती कि पूर्वनियोजित होती असा प्रश्न उपस्थित केलाय.
१) आयआयटीमध्ये पोरी साड्या नेसून कधीपासून लेक्चर अटेंड करु लागल्यात?
२) त्यांचे ड्रेस सारखेच कसे?
३) रोज हे सारखेच ड्रेस घालतात का?
४) ते बोले चुडींयावर नाचणार होते पण तितक्यात मोदी आले
५) अरे सप्राइज आहे की चित्रपटाची शुटींग आहे
६) हे खरं असेल तर
७) रोज हे असा ड्रेस वापरतात
८) सारखे ड्रेस पाहून सप्राइज
९) क्लास आहे की लग्न?
१०) हे विज्ञानापलीकडलं आहे
११) असे कपडे घालून कोण येतं?
१२) हे कॅज्युअल आहे
१३) मोदींचा जीव धोक्यात टाकला
१४) या दोघांना सलाम
१५) असे अचानक पत्रकारांसमोर आले पाहिजेत
पंतप्रधान मोदींच्या या सप्राइझ व्हिजिटच्या व्हिडीओने नेटकरीच सप्राइज झाल्याचं चित्र दिसत आहे, असेच हे ट्विट पाहून म्हणता येईल. अनेकांना हा अचानक दिलेली भेट वाटत नसून नियोजित भेट असल्याचं वाटत आहे, हे ट्विटवरुन स्पष्ट होतंय.