आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी चाहते काहीही करतील. तासन् तास रस्त्यावर असलेल्या टीव्ही शोरुमच्या बाहेर उभे राहतील, कामावर थाप मारून सामना पाहतील, बायकोशी वाद घालून सामना संपेपर्यंत रिमोट स्वत:कडे ठेवतील अशा एक ना दोन ना ना शक्कल लढवतील पण सामना काही चुकवणार नाहीत. पण एखाद्या संघाचा निस्सीम चाहता काय करु शकतो हे पाहायचं असेल तर हा व्हायरल झालेला फोटो पाहा. या व्यक्तीनं आपल्या आवडत्या संघाची फुटबॉल मॅच पाहण्यासाठी चक्क भाड्यानं क्रेन घेतली. आता आपल्या टीमवर त्याचं असलेलं पराकोटीचं प्रेम पाहता चर्चा तर होणारच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO …जेव्हा साधूचा वेश धारण करुन ब्रेट ली मुंबईतील मुलांबरोबर क्रिकेट खेळतो!

तुर्कीच्या फुटबॉट स्टेडियमधला हा फोटो आहे. हा व्यक्ती Denizlispor संघाचा चाहता आहे. या संघाची मॅच त्याला पाहायची होती. पण स्टेडियमवर येण्यासाठी त्याला वर्षभराची बंदी घातली होती. आता सामना पाहायला मिळणार नाही यामुळे निराश झालेल्या या ‘जबरा फॅन’नं आगळीच शक्कल लढवली. त्यानं चक्क क्रेनच भाड्यानं घेतली आणि ती मैदानाबाहेर लावली. या क्रेनवर चढून मोठ्या ऐटीत तो सामना पाहता होता. आपल्या संघाला पाठिंबा देत होता. एक सामना पाहण्यासाठी चाहता काय करू शकतो याचं ताजं उदाहरण हा फोटो आहे म्हणूनच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या चाहत्याला स्टेडियमध्ये बंदी नेमकी का घातली हे मात्र कळू शकलं नाही.

वाचा : अखेर आनंद महिंद्रांना ‘मार्केटिंग गुरू’चा पत्ताही सापडला!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After received one year ban a football fan hires crane to watch match
First published on: 30-04-2018 at 12:30 IST