सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनेक उद्योजक, व्यावसायिक इतरांना प्रेरणा देत असतात. या पोस्टमधून ते कधी इतरांच्या, तर कधी स्वतःच्या प्रेरणादायी गोष्टी पोस्ट किंवा व्हिडीओच्या माध्यमातून मांडत असतात. सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. चहा कंपनीच्या मालकाने एक पोस्ट शेअर केली. ती पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल तर झाली खरी; पण नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवरील कॅप्शन पाहून त्यांना ट्रोल केले.
‘चाय सुट्टा बार’ या चहा कंपनीचे सह-संस्थापक अनुभव दुबे यांनी एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांशी मीटिंगदरम्यान संवाद साधताना दिसत आहेत. तसेच या पोस्टला त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘आम्ही ९ ते ५ काम करणारे कर्मचारी शोधत नाही आहोत; तर आम्ही इथे एक आर्मी तयार करीत आहोत. ही पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना विविध मीम्स तयार करून ट्रोल केले आणि आता काय बॉर्डरवरून जाऊन चहा बनवणार का? अशा अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टखाली पाहायला मिळाल्या.
हेही वाचा…आता डासांपासून कायमची सुटका होणार? चिनी इंजिनीअरने बनवली डास मारण्याची भन्नाट मशिन, पाहा VIDEO
पोस्ट नक्की बघा :
तर नेटकऱ्यांचे ट्रोलिंग आणि कमेंट्स पाहून अनुभव दुबे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया एक्सद्वारे (पोस्ट) दिली आहे आणि कमेंट लिहून त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ‘९ ते ५ काम करणारे कर्मचारी नकोत’ या वाक्यावर अनुभव दुबे यांनी स्पष्टीकरण दिले की, आम्हाला एकाच खुर्चीवर बसून मशीनसारखी काम करणारी माणसे नको आहेत हे त्या वाक्यामागचे उद्दिष्ट आहे. तसेच ‘चहा विकणे ही काही मोठी गोष्ट नाही’ या नेटकऱ्यांच्या कमेंटवर त्यांनी सांगितले की, होय, आम्ही दररोज सुमारे अर्धा दशलक्ष कप चाय विकतो; ज्यात नोकरदार, कुंभार आणि ऑफिसमध्ये काम करणारे शेकडो व्यावसायिक असतात. त्यांनी दुबई, नेपाळ व ओमानमध्ये कंपनी उघडली आहे आणि त्यांच्या कॅनडा, अमेरिका व यूकेमध्येही कंपनी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच नेटकऱ्यांच्या आणखीन काही कमेंट्स आणि त्यांच्या वाक्यांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि अगदी शेवटी ज्यांचे माझ्या पोस्टमुळे मन दुखावले असेल, त्यांची मी माफी मागतो, असे लिहून धन्यवाद दिले आहेत. एका कागदार हे सर्व लिहून त्यांनी याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @tbhAnubhav एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि या पोस्टने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले आहे.