सध्या सोशल मीडियावर साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुनने ‘श्रीवल्ली’ गाण्यावर काही डान्स स्टेप्स केल्या आहेत ज्या खूप व्हायरल झाल्या आहेत. ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी रील करत आहेत. पण वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचा ‘श्रीवल्ली’ या गाण्यावरील डान्स मॅचमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

खरं तर, अनेक सेलिब्रिटी विकेट घेताच बॅकग्राउंडमध्ये ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या संगीतावर डान्स स्टेप्स करत आहेत, पण ब्रावोने विकेट घेतल्यानंतरच अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची नक्कल केली. ब्रावो चाहत्यांचे मनोरंजन करण्यास कधीही चुकत नाही. ‘पुष्पा’ केवळ भारतातच नाही तर जगभरात धमाल करत आहे. या चित्रपटातील अॅक्शन आणि गाणी सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

(हे ही वाचा: २२ महिन्यांचा चिमुकल्याने आईच्या फोनवरून ऑनलाइन ऑर्डर केले फर्निचर; किंमत १.४ लाख)

व्हिडीओ व्हायरल

ड्वेन ब्रावो सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बोरीशालकडून खेळत आहे. लीगच्या आठव्या सामन्यात कोमिल्ला व्हिक्टोरियन्सविरुद्ध विकेट मिळाल्यानंतर ब्रावोने ‘पुष्पा स्टाईल’ वॉक करत सेलेब्रेशन केलं.

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर कोंबड्याचा भन्नाट डान्स!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ब्रावोने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसत आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला तो हा डान्स करताना दिसला.