”वय हा फक्त आकाडाच!” अशी म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. अनेक लोकांनी ही म्हण खरी ठरवत वयाची पर्वा न करता अनेक आश्चर्यकारक कामगिरी केल्या आहेत. अशा अनेक प्रेरणादायी कथा तुम्ही ऐकल्या असतील. सध्या अशीच एक कथा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तब्बल १०४ वर्षे वय असलेल्या एकाने महिलेने स्कायडायव्हिंग करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. एवढचं नव्हे तर या महिलेने जागतिक विश्व विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला असून गिनीज बूकमध्ये नोंद होऊ शकते. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

स्काय डायव्हिंग शिकागो या एजन्सीने डोरोथी (Dorothy) नावाच्या महिलेला यासाठी मदत केली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ”आमची १०४ वर्षांची मैत्रीण डोरोथी हॉफनर हिला ‘स्कायडाइव्हिंग करणारी जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती’ होण्याचा प्रयत्न करण्यात मदत करणे हे खरचं आश्चर्यकारक होते! तिने गेल्या रविवारी हा प्रयत्न करून सर्वांना आठवण करून दिली की, ”वय फक्त एक आकडा आहे.”

हेही वाचा – शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

प्रशिक्षकासह डोरोथीचा स्काय डायव्हिंग करतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. जमिनीवर उतरल्यानंतर या महिलेने हा क्षण साजरा केला. एक जण तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, “खूप उत्तम कामगिरी केली”, त्यावर उत्तर देताना तिने सांगितले की, ”हे खूप अविश्वसनीय होते.” वयाच्या या टप्प्यावर धाडसी खेळ पूर्ण केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद पाहण्यासारखा आहे

हा व्हिडीओ २ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला असून ४६ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“हे खूप भारी आहे, अभिनंदन,” एकाने व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “खूपचं मस्त!” लँडिंग अगदी परफेक्ट होते,” असे दुसऱ्याने सांगितले. “उत्तम कामगिरी Dorothy! आम्ही Ohio मधून तुला पाठिंबा देत आहोत.” “मला हे प्रचंड आवडले! किती आश्चर्यकारक आहे. या महिलेची काळजी घेतल्याबद्दल स्काय डायव्हिंग शिकागो यांचे आभार,” अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक
जर डोरोथीने ही स्काय डायव्हिंग करून ही अद्याप गिनिजकडून विश्व विक्रम नोंदवला आहे की, नाही याची खात्रीपूर्वक माहिती मिळालेली नाही. सध्या हा विश्व विक्रम रुत लिनिया इंगेगार्ड लार्सो (Rut Linea Ingegard Laurso) नावाच्या १०३ वर्षाच्या स्विडन महिलेच्या नावार आहे जिने पॅरशूटमधून (Tandem Parachute Jump) उडी मारली होती. २०२२मध्ये १०३ वर्ष आणि २५९ दिवसांची असताना हा विक्रम स्वत:च्या नावी नोंदवला होता.