Uttarakhand Dharali Flash Floods Viral Photo : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथील धराली गावात ढगफुटी झाली. या ढगफुटीत अख्खं गाव बेचिराख झालं. या भीषण घटनेत आत्तापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेनंतरचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक फोटो आढळून आला, जो उत्तराखंडमधील धराली गावातील ढगफुटीनंतर झालेल्या विध्वंसाचा असल्याचा दावा केला जात होता. पण, खरंच हा फोटो त्या घटनेनंतरचा आहे, याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर कविता उपाध्याय यांनी व्हायरल फोटो त्यांच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा फोटो शेअर करत आहेत.
तपास :
या फोटोचे रिव्हर्स इमेज सर्च करताना आम्हाला आढळले की, हा फोटो अनेक वृत्तसंस्थांच्या वेबसाइट्सवरदेखील वापरला गेला आहे.
फोटो अतिशय स्पष्ट (sharp) असल्याने तो एआय-निर्मित असण्याची शक्यता वाटली.
त्यानंतर आम्ही हा फोटो एआय डिटेक्टरमध्ये अपलोड केला.
आम्ही हा फोटो decopy.ai मध्ये तपासला, तेव्हा तो ७४.१६ टक्के (probability) एआय-निर्मित असल्याचे दाखवण्यात आले.

त्यानंतर आम्ही तो HIVE Moderation मध्ये अपलोड केला. या डिटेक्टरनेही हा फोटो ९९.९ टक्के एआय-निर्मित असल्याचा निकाल दिला.

निष्कर्ष : उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे आलेल्या विनाशकारी पुराचे परिणाम दाखवण्याचा दावा करणारा व्हायरल फोटो एआय-निर्मित आहे, त्यामुळे व्हायरल फोटो खोटा (fake) आहे.