जगभर प्रसिद्ध असलेल्या मैत्रीवर आधारित फ्रेंड्स या मालिकेतील प्रत्येक पात्र आपल्याला माहिती आहे. यामालिकेतील मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल या आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांनी आपल्याला खळखळून हसवले आहे आणि आपले मनोरंजन केले आहे. आजही कित्येकजण आवर्जून ही सिरीज आवडीने पाहतात. तुम्ही फ्रेंडस मालिकेतील तुमच्या लाडक्या पात्रांना त्यांना तरुणपणीच्या किंवा सध्या ते कसे दिसतात हे तुम्ही पाहिले असेल पण ते लहानपणी कसे दिसत असतील? हे जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच वाटत असेल. आता AI टुल्सच्या मदतीने फ्रेंडसमधील पात्रांचे बालपणीचे रुप पाहायला मिळणार आहे.

AI फोटोजी वाढतेय क्रेझ

AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि त्याची ताकद काय आहे हे गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजले असेल. मीडजर्नी ते क्रुन सारख्या AI टुल्सच्या मदतीने अनेक डिजिटल आर्टिस्ट आपल्यासमोर नवनवीन फोटो घेऊन येत असतात. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची AI टुल्सच्या मदतीने तयार केलेली वेगवेगळ्या परिस्थितीमधील वेगवेगळी रुपे आपण पाहिली आहेत. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतींपासून क्रिकटर्सपर्यंत अनेकांचे फोटो AI टुल्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. आर्टिस्ट अशा लोकांचे फोटो तयार करत आहे आहे ज्यांना प्रत्येक व्यक्ती ओळखते त्यामुळेच या AI फोटोंना कदाचित एवढी प्रसिद्धी मिळत असावी. यावेळी असेच काही प्रसिद्ध व्यक्तींचे एआयने तयार केलेले फोटो व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Shark Attack : सर्फिंग करणे बेतले जीवावर! शार्कच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, लोकांमध्ये परसली दहशत

फ्रेंडस’मधील तुमच्या लाडक्या पात्रांचं बालपणीचं गोंडस रुप पाहा

इंस्टाग्रामवर फ्रेंडस सिरीजमधीलAI टुल्सच्या मदतीने तयार केलेले पात्रांचे बालपणीचे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल या सर्वांचे बालपणीचे रुप पाहायला मिळत आहे जे अतिशय गोंडस आहे. AIने तयार केलेल्या फोटोंना लोकांची खूप पसंती मिळत असून हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. जेनिफर अॅनिस्टन, डेव्हिड श्विमर, मॅथ्यू पेरी, मॅट ले ब्लँक, कोर्टनी कॉक्स आणि लिसा कुड्रो यांच्या ‘बेबी व्हर्जन्स’ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हेही वाचा- Video: बंजी जंपिगदरम्यान हवेतच तुटली दोरी, थरारक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

या फोटोवर जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचें बालरुप पाहून लोक आपल्या भावना व्यक्त करणे रोखू शकत नाही. कित्येक लोकांनी हे फोटो अगदी खरेखुरे वाटत असल्याचे सांगितले.

FRIENDS ही टीव्ही मालिका 1994 ते 2004 या कालावधीत प्रसारित झाली आणि चालू काळात ती सर्वाधिक पाहिली जाणारी सिटकॉम बनली. यात न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या मित्रांची आणि त्यांच्या जीवनातील चढ-उतारांचा मागोव घेणारी ही लोकप्रिय आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्हाला हे फोटो आवडले का? आम्हाला नक्की कळवा.